Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'ची प्रदर्शन तारिख बदलली; मिहिरने सांगितले लाँच रद्द करण्याचे कारण

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: चाहत्यांचा आवडता शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पुन्हा एकदा परत येत आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, सीझन २ आणण्याची घोषणा करण्यात आली.
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2Saam Tv
Published On

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: चाहत्यांचा आवडता शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पुन्हा एकदा परत येत आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, सीझन २ आणण्याची घोषणा करण्यात आली. या बातमीमुळे चाहते खूप आनंदी आहेत, कारण शोमध्ये स्मृती इराणी तुलसी आणि अमर उपाध्याय मिहिर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. शोची लाँचिंग तारीख ३ जुलै २०२५ असल्याचे सांगितले जात होते. पण आता चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शेवटच्या क्षणी, शोची लाँचिंग तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अखेर, या मोठ्या निर्णयामागील कारण काय आहे हे मिहिरने म्हणजे स्वतः अमर उपाध्याय यांनी सांगितले आहे.

'क्यूंकी सास भी कभी बहू थी' चे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार दुसरा सीझन ३ जुलै रोजी ऑन एअर होईल. पण आता चाहत्यांना शोसाठी आणखी थोडी वाट पहावी लागेल. शेवटच्या क्षणी, एकता कपूरने शोची लाँचिंग तारीख पुढे ढकलत काही पात्रांमध्ये बदल केल्याचे कारण सांगितले आहे.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
Aamir khan: 'मला मराठी भाषा येत नाही, याची...'; आमिर खान असं का म्हणाला? पाहा व्हिडिओ

शोची लाँच तारीख का पुढे ढकलण्यात आली?

तुलसीचा मिहिर शोमध्ये परतण्यासाठी खूप उत्सुक आहे. अमर उपाध्याय यांनी स्वतः लाँच तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की सेट पुन्हा तयार करावा लागेल, ज्यामुळे शोची लाँच तारीख पुढे ढकलावी लागली. अमर म्हणाला की, "सेटवरील रंगसंगती जशी असायला हवी होती तशी नव्हती. एकता कपूरला तिला काय हवे आहे हे चांगलेच माहित आहे, कारण ती एक परफेक्शनिस्ट आहे.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2
Shefali Jariwala: IT इंजीनियर होती शेफाली जरीवाला; अभिनेत्रीबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

तसेच शो ३ जुलै २०२५ रोजी लाँच होत नाही याची माहिती देखील अमर उपाध्याय यांनी दिली. जे शो कधी प्रसारित होईल याबद्दल अमरने सांगितले की, मूळ प्रीमियरच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त चित्रीकरण केले जाईल. पण हा शो आता कधी प्रसारित होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com