बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटचा आज (29 डिसेंबर) वाढदिवस (Pulkit Samrat Birthday) आहे. पुलकित आता 41 वर्षांचा झाला आहे. पुलकितचे मुंबईमध्ये आलिशान घर आणि महागड्या गाड्या आहेत. पुलकित सम्राटकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडी या आलिशान कार आहे. ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'फुकरे' स्टार पुलकित सम्राट 41 कोटी रुपयांचा मालक (Pulkit Samrat Net Worth) आहे. पुलकितने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. अभिनयासोबतच पुलकित अनेक ब्रँडच्या जाहिरातीतून पैसे कमावतो. याशिवाय तो मॉडेलिंगही करतो. मीडिया रिपोर्टनुसार, पुलकित सम्राट एका चित्रपटासाठी जवळपास 60 लाख रुपये घेतो.
पुलकित सर्वप्रथम 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत झळकला. त्यानंतर पुलकितने 'बिट्टू बॉस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुलकितला 'फुकरे' या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळली. 'फुकरे' चित्रपटाचे सर्व भाग कॉमेडी आहेत. त्यानंतर पुलकित हिट चित्रपट देत राहीला. पुलकित कोणतीही भूमिका चांगली निभावतो.
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) बॉलिवूडचे पावर कपल आहे. या दोघांनी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा लग्न सोहळा दिल्लीत पार पडला. हो दोघे खूप वेळापासून एकमेकांना डेट करत होते. क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट पहिल्यांदा पागलपंती'च्या सेटवर भेटले. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. पुलकित सम्राटचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.