Chetan Bodke
बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंडा आणि अभिनेता पुलकित सम्राटने लग्नगाठ बांधली आहे.
या कपलने एकमेकांना अनेक दिवस एकत्रित डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्ये लग्नगाठ बांधली.
नुकतंच क्रितीने इन्स्टाग्रामवर लग्नातले मोजकेच फोटो शेअर केलेत ज्यामध्ये तिने लग्नाची झलक दाखवली आहे.
क्रिती आणि पुलकितने लग्नामध्ये एकदम खास लूक केलेला दिसत आहे.
लग्नामध्ये क्रितीने पिंक कलरचा लेहेंगा आणि डायमंड ज्वेलरी असा लूक कॅरी केला होता.
तर पुलकितने लग्नामध्ये सी ग्रीन कलरची शेरवानी आणि फेटा परिधान केला होता.
लग्नामध्ये पुलकितने वेअर केलेल्या कुर्त्यावर गायत्रीमंत्र लिहिलेला आहे.
सध्या चाहत्यांकडून पुलकित आणि क्रितीला त्यांच्या सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.