Kiran mane FB Post : वासूदेवाच्या भूमिकेसाठी ब्राह्मणच हवा; 'त्या' जाहिरातीवर किरण मानेंनी ठेवलं बोट

Kiran mane Facebook Post on marathi serial advertise : किरण माने पुन्हा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चर्चेत आले आहेत. किरण माने मराठी मालिकेच्या जाहिरातीवर उपरोधिक टीका केली आहे.
Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Bigg Boss Marathi Instagram/ @kiranmaneofficial
Published On

मुंबई : अभिनेते किरण माने त्यांच्या परखड मतासाठी ओळखले जातात. सिनेसृष्टीत कोणत्याही चुकीच्या बाबीवर परखडपणे मत मांडण्यात किरण माने पुढे असतात. एखादी गोष्ट खटकली तर बेधडक सोशल मीडियावर पोस्ट सवाल उपस्थित करतात. अशाच एका जाहिरातीवर किरण मानेंनी उपरोधिक टीका केली आहे.

अभिनेते किरण माने यांनी एका जाहिरातीवर टीका केली आहे. माने यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरील जाहिरातीचा स्क्रिनशॉट शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. मालिकेतील एका पात्रासाठी विशिष्ट समाजाच्या कलाकाराची अट ठेवण्यात आली आहे. यावरून किरण मानेंनी टीका केली आहे. किरण माने यांना कंपनीची जाहिरात खटकली आहे.

किरण माने यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'मराठी मालिकेमध्ये वासूदेवाच्या भुमिकेसाठी कलाकार हवा आहे. फिल्मसिटीमध्ये शुटिंग सुरू आहे. त्यांची अट एकच आहे - 'कलाकार ब्राह्मण समाजातला, अर्थातच 'गुड लुकींग' हवा आहे. ऑडिशन्ससाठीची माहिती देणार्‍या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेला हा एक मेसेज आहे. 'जनसेवा' म्हणून त्याचा स्क्रीनशॉट टाकतोय. ब्राह्मण जातीतल्या ३१ ते ४० वयोगटातल्या पुरूषांनी तातडीने धाव घ्या. 'श्री स्वामी समर्थ कास्टिंग कंपनी'शी लगेच संपर्क साधा'.

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Kiran Rao On Laapata Ladies Film : ‘लापता लेडीज’ बॉक्स ऑफिसवर का आपटला? चित्रपट कोणामुळे झाला प्लॉप, किरण रावने  सांगितलं कारण

दरम्यान, किरण माने यांनी अनेक मराठी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच काही मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एका मालिकेच्या निर्मात्यांशी वाद झाला होता. त्यामुळे किरण माने यांना मालिका सोडावी लागली होती. पुढे ते बिग बॉसमध्ये किरण माने यांना संधी मिळाली होती.

Kiran Mane On Bigg Boss Marathi 5 Contestants
Kiran Mane Post : 'रितेशच्या रूपानं यंदाचा सीझन...';अभिनेता किरण मानेची बिग बॉसच्या होस्टसाठी खास पोस्ट

किरण माने हे अभिनय क्षेत्रात येण्याआधी स्वत:चे गॅरेज चालवत होते. मुलीच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करियर करायचं ठरवलं. तर काही महिन्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com