Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेत्याची तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी; नेटकरी भडकले, व्हिडिओ व्हायरल

khesari lal yadav Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेता खेसारीने तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी केली. त्याच्या टिप्पणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
khesari lal yadav News
khesari lal yadav Controversial StatementSaam tv
Published On
Summary

खेसारी लाल यादवचा जुना वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओत महिलेशी अश्लील संवाद करताना खेसारी दिसतोय

नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत अभिनेत्याच्या बहिष्काराची मागणी

आता खेसारीवरही माफीसाठी दबाव वाढतोय

Khesari Lal Yadav Video Viral: भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. पवन सिंहचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यावर अभिनेत्री अंजली राघवला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. यामुळे पवन सिंह मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग होत आहे. त्यानंतर आणखी एक अभिनेता वादात सापडला आहे. अभिनेता खेसारी लाल यादवचा एक जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर खेसारी लाल यादवचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्टेजवर खेसारी दिसत आहे. त्यांच्यासोबत दोन महिला उभे आहेत. त्यातील एका महिलेशी खेसारी संवाद साधत होता. त्याचा महिलेशी अश्लील संवाद व्हायरल होत आहे.

khesari lal yadav News
Mayurbhanj Shocking : संतापजनक! 80 किमीपर्यंत नेलं, तरुणीवर सामूहिक अत्याचार करून धावत्या कारमधून फेकलं

खेसारी यानेही पुढे वादग्रस्त टिप्पणी करत राहिला. मात्र, यानंतरही तरुणी खेसारीलाच धन्यवाद म्हणाली.यानंतर खेसारी त्याच्या महिला चाहत्यांच्या भेटी घेतो. खेसारी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

khesari lal yadav News
Blast in Firecracker Factory : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात अनेक कुटुंबावर दु:खांचा डोंगर

खेसारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. नेटकऱ्याने म्हटलं की, 'या अभिनेत्यावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे'. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'भोजपुरी सिनेमा आणि अभिनेत्याला वाईट बोलू नये'. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'हा अडाणी आहे का?'. तर एकाने हा कोण आहे, असं म्हटलं आहे.

khesari lal yadav News
Maratha Reservation : मराठा बांधवांना 'सरसकट कुणबी' संबोधण्यास नकार, सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानं सरकारसमोर पेच, उपसमिती चर्चा करणार

पवन सिंहने वादग्रस्त व्हिडिओनंतर माफी मागितली. अभिनेता पवन सिंहनंतर आता खेसारी लाल यादववर देखील माफीसाठी नेटकऱ्यांकडून दबाव वाढत आहे. त्यामुळे आता खेसारी लाल यादव आता माफी मागणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com