Mayurbhanj Shocking : संतापजनक! 80 किमीपर्यंत नेलं, तरुणीवर सामूहिक अत्याचार करून धावत्या कारमधून फेकलं

Mayurbhanj crime news : नोकरीचं आमिष देऊन तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणीवरील सामूहिक अत्याचाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Mayurbhanj crime
Mayurbhanj crime news : Saam tv
Published On
Summary

मयूरभंजमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार

तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार

अत्याचारानंतर तरुणीला कारमधून फेकून दिलं

तरुणीवरील अत्याचारानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित

ओडिशाच्या मयूरभंजमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मयूरभंजमध्ये शनिवारी सुदूर बांगिरीपोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उदला-बालासोर राज्य राजमार्गावर वाहनात तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. तरुणीवर सहा जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचं उघड झालंय. अत्याचारानंतर पीडित तरुणीला कारमधून फेकून दिलं. तरुणीवरील अत्याचारानंतर पुन्हा देशात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, बांगिरीपोशी येथील घरी येऊन दोघांनी नोकरीचं आश्वासन दिलं. त्यानंतर दोघांनी बाहेर नेऊन कारमध्ये बसवलं. याच कारमध्ये आणखी तीन जण बसले होते. तर सहावा व्यक्ती कार चालवत होता. तरुणीला ८० किलोमीटरपर्यंत दूरवर नेल्यानंतर एका सामसूम जागी कार थांबवली. त्यानंतर कार थांबवून तिच्यावर अत्याचार केला.

Mayurbhanj crime
Dombivali : रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडी अन् फेरीवाल्यांच्या गराडा; तरुणाने मांडली गणपतीच्या देखाव्यातून व्यथा

कारमधून फेकून दिल्यानंतर तरुणीने कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी अत्याचाराविषयी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली.पोलिसांनी ६ आरोपींची ओळख पटवली आहे. ६ आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Mayurbhanj crime
ManoJ Jarange Patil : आंदोलनाचा शेवट मला गोळ्या घालून होईल; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा, VIDEO

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दोघांना ताब्यात घेतलं आहे. पीडित कुटुंबाने ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपींवर कलम ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणात सामील झालेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यासाठी तपास सुरु केला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com