KEM Hospital On Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळली, आता डॉ. सेजल पवारवर KEM करणार कारवाई

KEM Hospital On Sejal Pawar Viral Video: प्रणित मोरेच्या शोमधील डॉ. सेजल पवारच्या व्हायरल वक्तव्यावरून KEM रुग्णालय कारवाई करणार आहे.. चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण व्हिडिओची तपासणी सुरू आहे.
KEM Hospital On Sejal Pawar Viral Video
KEM Hospital On Sejal Pawar Viral VideoSaam Tv
Published On

KEM Hospital On Sejal Pawar Viral Video: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्यामुळे आधीच चर्चेत आलेल्या या शोमधील आणखी एका क्लिपने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये KEM रुग्णालयातील एमबीबीएसची विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्यावरून ती सध्या ट्रोलिंगचा सामना करत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत KEM रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयाने वरिष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

KEM Hospital On Sejal Pawar Viral Video
Model Arrested: बँकॉकहून गांजाची तस्करी करणाऱ्या मॉडेलला अटक; ११.८२ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

KEM रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. हरिश पाठक यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाने तातडीने पावले उचलली आहेत. मृतदेहांबाबत करण्यात आलेली टिप्पणी अत्यंत आक्षेपार्ह असून रुग्णालय प्रशासन या विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहत आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ तपासण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

KEM Hospital On Sejal Pawar Viral Video
Pranit More FIR: '370 बिर्याणी' वादामुळे प्रणित मोरे अडचणीत; महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हा दाखल

या समितीत पदवीपूर्व वसतिगृहाच्या वॉर्डन आणि बायोकेमिस्ट्री विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता चालक यांचा समावेश आहे. तसेच मेडिसीन विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. श्रद्धा मोरे यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे. डॉ. मोरे या KEM रुग्णालयाच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाची जबाबदारीही सांभाळतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने संबंधित कार्यक्रमाचे संपूर्ण रेकॉर्डिंग तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल झालेली दोन मिनिटांची क्लिप या कार्यक्रमातीलच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीदरम्यान डॉ. सेजल पवारचे स्पष्टीकरणही नोंदवले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com