Famous Actress : सिनेसृष्टी हादरली! घरगुती वाद टोकाला गेला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातवाईकांनीच केला चाकू हल्ला, नेमकं घडलं काय?

Famous Actress Husband Stabbed By Relatives : मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातेवाईकांनीच चाकूने हल्ला केला आहे. सध्या अभिनेत्रीचा नवरा रुग्णालयात दाखल आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
Famous Actress Husband Stabbed By Relatives
Famous Actresssaam tv
Published On
Summary

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा रुग्णालयात दाखल आहे.

अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातेवाईकांनीच हल्ला केला आहे.

नवऱ्यावर नातेवाईकांनी चाकूने वार केला.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यावर नातेवाईकांनीच चाकूने हल्ला केला आहे. अभिनेत्रीचा नवरा सध्या रुग्णालयात दाखल आहे. कन्नड टीव्ही अभिनेत्री काव्या गौडा ही कौटुंबिक वादामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच तिच्या कुटुंबातील वाद वाढला, ज्यामुळे तिचा पती सोमशेखरवर नातेवाईकांनी चाकूने हल्ला केला. पोलिस तक्रारीनुसार, ही घटना जवळच्या कुटुंबातील सदस्यांमधील जोरदार वादादरम्यान घडली. त्यादरम्यान सोमशेखरवर धारदार शस्त्राने हल्ला झाला. वाद वाढला आणि या वादात सोमशेखरवर चाकूने हल्ला करण्यात आला.

काव्या गौडा कोण?

काव्या गौडा ही कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. तिने 'गांधारी' आणि 'राधा रमण' सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. काव्या एक ज्वेलरी डिझायनर देखील आहे. तिचा पती सोमशेखर बेंगळुरूमध्ये एक यशस्वी व्यापारी आहे. या जोडप्याने 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी देखील आहे.

काव्या गौडाचा पती रुग्णालयात दाखल

चाकू हल्ल्यानंतर, काव्या गौडाचे पती सोमशेखर यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमशेखर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकत्र कुटुंबात राहत असताना घरात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावातून हा वाद निर्माण झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती बाबी आणि काव्या- सोमशेखर यांच्या मुलीच्या काळजीबाबत झालेल्या संभाषणादरम्यान हा वाद झाला. जो तीव्र वादात रूपांतरित झाला. वाद वाढत असताना परिस्थिती आणखी बिकट झाली.

कौटुंबिक वादाचे हाणामारीत रूपांतर

सोमशेखरचा भाऊ आणि नातेवाईकांसह कुटुंबातील अनेक सदस्यांचा या भांडणात सहभाग होता. काव्याची बहीण भव्या यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. दोन्ही बाजूंनी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यावरून असे दिसून येते की, दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. पोलीस सध्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

काव्या गौडा यांनी माध्यमांना सांगितले की, हा वाद गैरसमज आणि खोट्या आरोपांमुळे सुरू झाला होता. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सध्या तिचे संपूर्ण लक्ष नवऱ्याच्या तब्येतीकडे आणि मुलीच्या सुरक्षिततेवर आहे. कायदेशीर न्याय मिळवेल, असे तिने सांगितले आहे.

Famous Actress Husband Stabbed By Relatives
Ajit Pawar Death : अजित पवारांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा; रितेश देशमुख ते सुबोध भावे, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com