धनुष आणि मृणाल ठाकुर फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दोघे एकमेकांना खूप वेळापासून डेट करत असल्याचे बोले जात आहे.
लग्नाच्या चर्चांदरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इंडस्ट्रीत सध्या साऊथ अभिनेता धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच ही दोघे खूप वेळापासून एकमेकांना डेट करत असल्याचेही बोले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असे बोले जात आहे की, ही क्यूट जोडी 14 फेब्रुवारी 2026ला म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला लग्न बंधनात अडकणार आहे. त्यामुळे यांचे चाहते भलतेच खुश पाहायला मिळत आहे.
लग्नाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने यावर आपले स्पष्ट मत दिले आहे. मृणालच्या जवळच्या व्यक्तीकडून असे समजले की, धनुष आणि मृणालच्या लग्न ही एक अफवा आहे. मृणाल ठाकुर पुढच्या महिन्यात लग्न करत नाही आहे. मृणालच्या फेब्रुवारी महिन्यात तिचा आगामी चित्रपट 'दो दीवाने शहर में' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच यानंतर मार्चमध्ये तिचा एक तेलुगू चित्रपट प्रदर्शित होत आहे.
मृणाल आणि धनुष बऱ्याच काळापासून डेटिंग करत आहेत. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. हे सर्व ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झाले, जेव्हा मृणाल तिच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये धनुषला भेटण्यासाठी धावली. तसेच धनुष मृणालला पाठिंबा देण्यासाठी आला असल्याचे बोले गेले. अलिकडेच एका मिडिया मुलाखतीत मृणाल ठाकूरने सांगितले की, "मला या डेटिंगच्या अफवा खूप मजेशीर वाटल्या. धनुष माझा फक्त एक चांगला मित्र आहे. धनुषला अजय देवगण यांनी 'सन ऑफ सरदार 2'च्या प्रिमियरला आमंत्रित केलं होते. "
'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या इव्हेंटनंतर मृणालच्या बर्थडे पार्टीलाही धनुषची हजेरी होती. तसेच मृणाल ठाकूर धनुषच्या बहिणींना देखील सोशल मीडियावर फॉलो करते. यामुळे मृणाल ठाकुर आणि धनुषच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले.मृणाल ठाकुर आणि धनुषच्या वयात तब्बल 9 वर्षांचे अंतर आहे. चाहते आता यांच्या नात्याचे पुढे काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.