बॉलिवूड हे नाव कानावर पडताच आपल्याला अनेक गोष्टी सरकन दिसून जातात. बॉलिवूड इंडस्ट्री असो वा मराठी चित्रपट सृष्टी असो कलांकाराचा साज-श्रृंगार पाहून प्रत्येकजण अंचबित होतो. कारण प्रत्येक महिला कलाकार तसेच पुरुष कलाकांराचा लुक नेहमीच सर्वत्र चर्चेत असतो.
मात्र कलांकारांचे हे विशेष लुकचे क्रेडीट हे त्यांच्या लुकसाठी मेहनत घेण्याऱ्या मेकअप तसेच ड्रेस (Dress)डिझायनरचे असतात. यात एका विशेष गोष्टींचा उल्लेख करावासा वाटत आहे तो म्हणजे, ज्या वेळेस बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीट कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मराठी सणांचे आणि लग्नाचे कार्यक्रम दाखवले जातात. तेव्हा त्यात अभिनेत्रीच्या हातावर मेंहदी तुम्ही पाहिली असेल. मात्र ही गोष्ट बोलण्याचे विशेष कारणही तसेच आहे. ज्यात प्रेक्षकांना टीव्हीवर साधारण वाटणारी मेंहदी जी काढणाऱ्या खास अशा महिलेची गोष्ट आहे.
बॉलिवूडमध्ये(Bollywood) आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. अनेकजण या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी किंवा एखादा लहानसा रोल मिळवण्यासाठी झगडत असतो.आपल्यापैंकी प्रत्येकाने इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या सस्केस स्टोरी ऐकल्या आहेत. एकेकाळी सामान्य व्यक्ती असलेला सध्या इंडस्ट्रीमध्ये आधिराज्या गाजवत आहेत काही व्यक्ती ते फक्त अभिनयाच्या जारोवर तर काही त्यांच्यात असलेल्या कलांमुळे.आजही आपण अशा अनेक यशस्वी व्यक्तीमधील एका महिलेची सस्केस स्टोरी पाहणार आहोत.ज्यात एक महिला फक्त मेंहदी काढण्याच्या कलेवर सध्या बॉलिवूडमध्ये त्यांनी स्वता:चे अस्तित्व निर्माण केलेले आहे.
''विना नागदा''यांचे नाव तुम्ही बॉलिवूडमध्ये कोणत्याही प्रसिद्ध कलाकारांच्या अनेक मुलाखतीमध्ये ऐकले असेल.मात्र लाखोंमध्ये असलेल्या काही प्रेक्षकांना विना नगाडा कोण आहेत?हे माहिती नाही.चला तर आज विना नागदा यांच्याबद्दल जाऊन घेऊयात.
कोण कोणत्या सेलिब्रिटीची मेहंदी काढली?
गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराचे लग्न (Wedding)मोठ्या धुमधड्याकात पार पडत आहे. अनेक विवाहसोहळे प्रत्येक सामान्य व्यक्तीपासून ते प्रसिद्ध कलाकांरामध्ये कुतूहलाचा विषय ठरतात. त्यात मग डेकोरेशन असो मग कलांकारांचे लुक आणि महत्त्वाचे म्हणजे अभिनेत्रींच्या हातावर असलेली मेंहदी. मग बॉलिवूडमध्ये कोणत्याही कलाकाराचे लग्न असो मग वीणा नागदा यांचे नाव सर्वांच्या होटावर असते.
तुम्हाला माहिती आहे का? वीणा नागदा यांनी प्रसिद्ध अभिनेत्री यांच्या लग्नानंतर त्यांच्या हातावर दरवर्षी करवा चौथला मेंहदी काढत आल्या. अभिनेत्री कतरिना असो वा आलिया यांच्या लग्नातही विना नागदा यांनी मेंहदी काढली होती. एवढेच नाही तर दीपिका पादुकोन, कटरीना कैफ, अमृता अरोडा ,मलाइका अरोडा खाना, हेमा मालिनी आणि ईशा देओल , टीना अंबानी,ट्विंकल खन्ना, प्रियंका चोपडा,काजोल. शर्मिला टैगोर, काजल अग्रवाल, कपिल शर्मा यांची पत्नी,जरीन खान, शिल्पा शेट्टी , फराह खान एवढेच नाही तर डिंपल कपाडिया ,माधुरी दीक्षित, आशा भोसले ,एकता कपूर, जया प्रदा शिवाय प्रसिद्ध नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या मुलगी ईशा अंबानी शिवाय सून श्लोका मेहता यांच्या हातावर मेंहदी काढलेली आहे. बॉलिवूडच नव्हे तर यांनी विक्की जैन और अंकिता लोखंडे यांच्या लग्नातही मेंहदी काढली होती
कोणत्या चित्रपटात मेहंदी काढली अन् कोणत्या प्रकारच्या मेहंदी काढते
विना नागदा प्रसिद्धी(publicity) फक्त कलांकारांच्या हातावर मेंहदी काढण्यापूरती मर्यादित नाही., तर विना नागदा यांनी बॉलिवूडमध्ये चित्रपटासाठी शूट असलेल्या लग्नातही मेंहदी काढण्यासाठी विना नागदा यांची ओळख आहे. विना नागदा यांनी कतरिना कैफच्या हमको दिवान कर गये या या चित्रपटात त्यांनी मेंहदी काढली होती. शिवाय तुम्ही विना नागदा यांच्या मेंहदी डिझाईन पाहिल्या तर भारावून जाल. भारतातच नव्हे तर परदेशातही विना नागदा यांच्या मेंहदी डिझाईन फेमस आहेत. यात तुम्हाला ब्रायडल नेल पॉलिश शेडेड आणि डायमंड पर्ल जरदोशी शिवाय अरेबिक ब्लॅक मेगंदी डिझाईन अशा अनेक मेंहदी डिझाईन प्रसिद्ध आहेत.
विना नागदा मेहंदी काढण्यासाठी किती मानधन घेतले जाते
आतापर्यंत विना नागदा यांनी कोणत्या सेलिब्रिटीच्या हातावर मेंहदी काढली ते पाहिले मात्र तुम्हाला माहिती आहे का?विना नागदा या मेंहदी काढण्यासाठी किती पैसे घेतात. एका मीडिया रिपोर्टनुसार, विना नागदा या एका कार्यक्रमात मेंहदी (mehndi)काढण्यासाठी सुरुवात ११ हजारांपासून करतात मग ते लाखोंच्या घरात पैसे घेतात. विना नागदा यांनी फक्त भारतातच नव्हे तर बँकॉक आणि हाँगकाँग, मलेशिया, बेल्जियम, ग्रीस, हॉलंड, लंडन, मॉरिशस शिवाय पॅरिस, फुकेत, सिंगापूर, तुर्की, अमेरिका अशा अनेक देशांमध्ये काम केलेले आहे.
कुठल्या आहेत शिवाय शिक्षण किती, इथंपर्यंत कशा पोहचल्या ?
मेंहदी क्विन असलेल्या विना नागदा यांचा जन्म मुंबई (Mumbai)शहरात झाला. विना नागदा मुळच्या जैन कुटूंबातील. यांच्या कुटुंबात त्या पकडून एकूण पाच बहिणी विना नागदा या सर्वात लहान होत्या.विना नागदा यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती मात्र वडिलांच्या धाकाने विना नागदा यांना त्यांच्या वडिलांनी फक्त दहावीपर्यंत शिकून दिले. पुढील शिक्षणास मनाई केल्याने विना नागदा यांनी घरी राहूनच काही तरी करायचे ठरवले. मग त्यांनी मेंहदी या कलेत स्वता:ता हातखंडा बसवला मग काय प्रचंड मेहनत आणि पाहता पाहता काही वर्षातच विना नागदा या मेंहजी आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध झाल्या. अवघ्या १७ वर्षांच्या वयापासून विना नगादा यांनी प्रवास सुरु केला.मात्र विना पूनम ढिल्लन या वीणा नागदा यांची पहिली सेलिब्रिटी ग्राहक होती. मात्र विना नागदा यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती हृतिक रोशनच्या लग्नामुळे.त्यानंतर अनेक अभिनेत्रींच्या लग्नात आणि कार्यक्रमात विना नागदा या कायम दिसून आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.