Upcoming EV: मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! बाजारात येत आहे 21 नवीन इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर माहिती

Hyundai New Electric SUV: जे जास्त रेंज असलेली EV खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Hyundai आपली सर्वात हाय रेंज EV लवकरच सादर करणार आहे.
मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! बाजारात येत आहे 21 नवीन इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर माहिती
Hyundai New Electric SUVSaam Tv
Published On

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. यातच अनेक कंपन्या आपले नवीन मॉडेल्स बाजारात सादर करत आहेत. पण तरीही ईव्हीमध्ये तीन सर्वात मोठ्या समस्या असल्याचं दिसत आहे. ज्यामध्ये स्लो चार्जिंग, कमी रेंज आणि जास्त किंमत यांचा समावेश आहे. पण जसजशी मागणी वाढेल तसतशी या तिन्ही समस्या दूर होतील, असे ईव्ही तज्ज्ञांचे मत आहे.

जे जास्त रेंज असलेली EV खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. Hyundai आपली सर्वात हाय रेंज EV लवकरच सादर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आता हाय रेंज इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित करत आहे. हायब्रीड मोडमध्ये वाहने आणण्यासाठी Hyundai योजना आखात आहे.

मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! बाजारात येत आहे 21 नवीन इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर माहिती
Ethanol वर धावणारी आणखी एक बाईक येतेय; कधी होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hyundai Motor India येत्या काही वर्षांत अनेक नवीन EV लॉन्च करणार आहे. कंपनीचे संपूर्ण लक्ष इलेक्ट्रिक वाहनांवर केंद्रित केलं आहे. एका रिपोर्ट्सनुसार, 2030 पर्यंत 5.55 मिलियन कार विकण्याचे कंपनीचे लक्ष आहे. यातच Hyundai चे 5.55 मिलियन कारमध्ये 2 मिलियन इलेक्ट्रिक वाहन विक्रीचेही लक्ष आहे.

21 इलेक्ट्रिक कार होणार लॉन्च

रिपोर्ट्सनुसार, Hyundai नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 900 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. 2030 पर्यंत 21 इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याचे कंपनीचे लक्ष आहे. यासोबतच या इलेक्ट्रिक कार्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची किंमत कमी करण्यावरही कंपनी लक्ष देत आहे. याचाच अर्थ ह्युंदाई ईव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! बाजारात येत आहे 21 नवीन इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर माहिती
Maruti, Hyundai, MG आणि Tata या पॉवरफुल कार सप्टेंबरमध्ये करणार लॉन्च, पाहा लिस्ट

Hyundai भारतात SUV सोबत अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी Kona आणि Ioniq 5 नंतर भारतात पहिली मास इलेक्ट्रिक SUV सादर करणार आहे. कंपनी पहिल्यांदा Creta EV लॉन्च करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com