July 1st Week Movie Releases : मराठी - हिंदी चित्रपटांमध्ये पुन्हा तगडी टक्कर; एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' ४ सिनेमे, आताच तारीख SAVE करा

July 2026 First Week Movie Releases : जुलैच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटांचा धमाका पाहायला मिळणार आहे. कोणते चित्रपट रिलीज होणार पाहा.
July 2026 First Week Movie Releases
July- 1st Week Movie Releases SAAM TV
Published On
Summary

थिएटरमध्ये पुन्हा एकदा मराठी-हिंदी चित्रपट आमनेसामने पाहायला मिळणार

२ मराठी आणि २ हिंदी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत.

बॉलिवूड आणि मराठी कलाकारांमध्ये तगडी टक्कर

नवीन महिन्यात पहिल्याच आठवड्यात मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. एकाच दिवशी म्हणजे ३ जुलै २०२६ ला (शुक्रवारी) २ मराठी आणि २ हिंदी चित्रपट रिलीज होत आहेत. कोणत्या चित्रपटाला अधिक गर्दी जमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चित्रपटांची यादी पाहूया.

अल्फा (Alpha)

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघचा अल्फा चित्रपट ॲक्शन, स्पाय, थ्रिलर आहे. 'अल्फा' हा यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे.'अल्फा' चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. 'अल्फा' हा भारतातील पहिला महिला-प्रधान ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात हृतिक रोशन एका दमदार कॅमिओमध्ये दिसणार आहे.

बेबी डू डाय डू (Baby Do Die Do )

'बेबी डू डाय डू' हा क्राइम, अॅक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट बेबी कर्मारकर नावाच्या एका सामान्य कर्णबधिर-मूक एनजीओ कार्यकर्तीची कथा आहे. जी गुप्तपणे मुंबईत एक निर्दयी सुपारी किलर म्हणून काम करते. चित्रपटात हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत झळकली आहे.

मर्दिनी (Mardini)

'मर्दिनी' चित्रपट एका आईवर आहे, जी आपल्या मुलीसाठी कोणतेही धाडस करू शकते. 'ज्याला आई मारी, त्याला कोण तारी' ही टॅगलाईन खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटात आईच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार मायरा वायकुळ झळकणार आहे.

आऊट ऑफ सिलेबस (Out Of Syllabus)

'आऊट ऑफ सिलेबस: पुस्तकांच्या पलीकडे' हा चित्रपट MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेता अजिंक्य राऊत, अभिनेत्री अद्वयी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

नागबंधम: द सीक्रेट ट्रेजर (Nagabandham - The Secret Treasure)

'नागबंधम: द सीक्रेट ट्रेजर' हा साऊथ चित्रपट आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदीत डब होणार आहे. हा पौराणिक कथा आणि इतिहासावर आधारित एक भव्य अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट आहे. ही कथा एका योद्ध्याभोवती फिरते.

July 2026 First Week Movie Releases
Singer : पाणी प्यायलं अन् थेट स्टेजवर कोसळला; लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान प्रसिद्ध गायकाला नेमकं झालं काय? VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com