आलिया भट्ट लवकरच 'अल्फा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
'अल्फा' चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ झळकणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. जगभरात तिचा चाहता वर्ग आहे. लवकरच आलिया भट्ट 'अल्फा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'अल्फा' चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. 'अल्फा' हा यशराज फिल्म्सचा चित्रपट आहे. 'अल्फा' ॲक्शन, स्पाय, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत शर्वरी वाघ देखील झळकणार आहे.
'अल्फा' चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार. मात्र मीडिया रिपोर्टनुसार 'अल्फा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'अल्फा' चित्रपट याआधी 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. 'अल्फा' चित्रपट आता नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अल्फा' 17 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे. चित्रपटात उत्तम व्हीएफएक्स म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स पाहायला मिळणार आहे. ज्यासाठी प्रेक्षक आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या प्रवक्त्यानी सांगितले की, "अल्फा हा आमच्यासाठी खास चित्रपट आहे. आम्ही तो सिनेमॅटिक स्वरूपात सादर करू इच्छितो. आम्हाला जाणवले की व्हीएफएक्सला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागेल. अल्फा हा सर्वांना आवडेल असा थिएटर अनुभव बनवण्यात आम्ही कोणतीही कसर सोडू इच्छितो. म्हणूनच, आम्ही आता 17 एप्रिल 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत." आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
'अल्फा' हा भारतातील पहिला महिला-प्रधान ॲक्शन चित्रपट आहे.'अल्फा' चित्रपटात आलिया भट्ट, शर्वरी वाघ, बॉबी देओल आणि अनिल कपूर झळकणार आहेत. चित्रपटात आलिया आणि शर्वरीचा बॉबी देओलविरुद्ध पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा संघर्ष पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 2026 मध्ये आलिया भट्टचा 'लव्ह अँड वॉर' चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात आलियासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.