प्रसिद्ध गायक लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक स्टेजवर कोसळला
गायक पाणी पितो आणि स्टेजवर कोसळतो
गायकाला पाहून चाहते चिंतेत
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान पाणी पितो आणि स्टेजवर कोसळतो, ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात. 'वन डायरेक्शन' (One Direction) या बँडचा सदस्य हॅरी स्टाइल्स (Harry Styles) अलिकडेच एका कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर कोसळतो. गायक हॅरी स्टाइल्स लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर आपला परफॉर्मन्स देत असताना ही घटना घडली.
२६ जून रोजी लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर परफॉर्मन्स करताना हजारो चाहत्यांसमोर गायक हॅरी स्टाइल्स स्टेजवर कोसळला. तो 'ॲज इट वॉज' (As It Was) हे गाणे गात होता. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, गायक गाणे सुरू असताना समोर ठेवलेल्या काळ्या रंगाच्या बाटलीतून पाणी पिताना दिसतो. पाणी प्यायल्यावर तो ते हवेत उडवताना दिसतो. त्यानंतर काही सेकंदात तो धापा टाकत, वाकून उभा राहिल्याचे दिसतो. त्यानंतर तो हळूहळू खाली कोसळतो. त्याला श्वास घेताना त्रास होतो. तो खोकताना दिसत आहे.
हॅरी स्टाइल्सने कॉन्सर्टसाठी फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट परिधान केली होती. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्यावर तो शर्टचा कॉलर ओढताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. मंचावर कोसळल्यानंतर स्टाइल्स श्वास सावरण्याचा प्रयत्न करताना आणि पोटावरून हात फिरवताना दिसला. त्यानंतर १० ते २० सेकंदांनंतर गायक उठून उभा राहिला. त्याने स्वतःला सावरले आणि कार्यक्रम पुढे चालू ठेवला.
गायक हॅरी स्टाइल्स सध्या त्याच्या 'टुगेदर, टुगेदर' या दौऱ्यावर आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी गायकाच्या तब्येतीसाठी चिंता व्यक्त करत आहेत. तसेच परफॉर्मन्स पूर्ण केल्याबद्दल कौतुक देखील करत आहेत. हॅरी स्टाइल्स हा ब्रिटिश गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. त्याने आजवर आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.