भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हत्या करण्यात आली आहे. इन्फ्लुएन्सर नॅन्सी ग्रेवाल ही कॅनडामध्ये राहत होती. ती एक लोकप्रिय युट्यूबर होती. या घटनेमुळे मनोरंजनसृष्टी आणि सोशल मिडिया चांगले हादरले आहे. 45 वर्षीय नॅन्सी ग्रेवालची तिच्या राहत्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात आली. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
कॅनडा मीडिया रिपोर्टनुसार, नॅन्सी ग्रेवालची हत्या मंगळवारी (3 मार्च) रात्री 9.30 च्या सुमारास घडली. पोलिसांना माहिती मिळाली की,विंडसरच्या टॉड लेन परिसरात राहणाऱ्या नॅन्सी ग्रेवालच्या घरात तिच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. यामध्ये नॅन्सी खूप जखमी झाली. मारेकरी ते पाहून तिथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. नॅन्सी ग्रेवालला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहे. तसेच घटनेमागील हेतू शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तिच्या हत्येबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत. तथापि, पोलीसांनी अद्याप कोणत्याही अधिकृत स्पष्ट माहिती दिली नाही. ते सर्व संभाव्य पैलूंची चौकशी करत आहेत. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय आणि पंजाबी समुदायातील सदस्यांनीही चिंता आणि संताप व्यक्त केला आहे.
नॅन्सी ग्रेवाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पंजाबी युट्यूबर होती. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ बनवायची आणि आपली मते स्पष्ट मांडायची. पोलीस सध्या तिच्या हत्या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.