रश्मिका-विजयचा हैदराबादमध्ये थाटामाटात रिसेप्शन सोहळा पार पडला.
रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार पाहायला मिळाले.
रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले.
सध्या सर्वत्र रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकताच रश्मिका-विजयचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांचा लग्न सोहळा कुटुंब आणि जवळचा मित्र परिवार यांच्यात थाटामाटात साजरा झाला. मात्र रिसेप्शनला बॉलिवूड, हॉलिवूडचे मोठे कलाकार पाहायला मिळाले. यांनी वधू-वरांना शुभ आशीर्वाद आणि प्रेम दिले. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी देखील कलाकारांचे हात जोडून सुंदर स्वागत केले. त्यांना मिठी मारली.
रश्मिका-विजयला आशीर्वाद देण्यासाठी हॉलिवूड आणि बॉलिवूडचे कलाकार पाहायला मिळाले. यात साउथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी, नागार्जुन अक्किनेनी, राम चरण, अल्लू अर्जुन, रवि तेजा, महेश बाबूची बायतो नम्रता शिरोडकर आणि मुलगी सितारा, राधिका सरथकुमार यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांचा समावेश होता. तर बॉलिवूडमधून मृणाल ठाकुर, रिया चक्रवर्ती , करण जौहर, नीना गुप्ता आणि कृती सेनॉन हे कलाकार उपस्थित होते. रश्मिका-विजयला आशीर्वाद देण्यासाठी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आले होते. रश्मिका-विजयचे चाहते त्यांच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे 4 मार्च 2026ला हैदराबादमध्ये थाटामाटात रिसेप्शन पार पडले. रश्मिकाने रिसेप्शनसाठी लाल रंगाची गोल्डन काठ असलेली साडी नेसली होती. ज्यावर सुंदर वर्क पाहायला मिळाले. गोल्डन ज्वेलरी, केसांची वेणी, ग्लॉसी मेकअप, कपाळावर बिंदी आणि कुंकू लावून तिने हा लूक पूर्ण केला होता. विजयने साऊथ स्टाइल पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. खांद्यावर अंगवस्त्रम घेतले होते. विजय रिसेप्शन लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता. दोघांच्या केमिस्ट्रीची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने तेलुगू हिंदू आण कोडावा अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा उरकला. दोघे आता लवकरच 'राणाबली' (Ranabaali ) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी 2018 ला रिलीज झालेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 साली 'डियर कॉमरेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.