Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

Death News: प्रसिद्ध रॅपर-गायक यो यो हनी सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हनी सिंगचा पुतण्या विदित ओलाक याचा पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.
Honey Singh nephew Vidit Olak and his friend passes away
Honey Singh nephew Vidit Olak and his friend passes away Saam TV
Published On: 

Death News: प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हनी सिंगचा पुतण्या विदित ओलाक याचा पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याचा मित्र आरव तलवार याचाही मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. दोघेही एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हनी सिंगनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हनी सिंगने शेअर केली पोस्ट

पुतण्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हनी सिंगने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, माझ्यासाठी हे एक अत्यंत दुःखद दशक आहे. माझ्या पुतण्याचे अपघातात निधन झाले. भोलेनाथ, कृपा करा.

Honey Singh nephew Vidit Olak and his friend passes away
Yetech Aata Me Nandayla: बांदेकरांची सून झळकणार नव्या मालिकेत, लोकप्रिय अभिनेत्यासोबत जमणार जोडी; तारीख अन् वेळ जाहीर!

हनी सिंगचा पुतण्या विदित ओलाक

या अपघातातील मृत विदित ओलाक हा यो यो हनी सिंग याचा पुतण्या होता. तसेच तो प्रसिद्ध पंजाबी म्युझिक कंपनी 'स्पीड रेकॉर्ड्स'चे मालक दिनेश यांचा मुलगा होता. तर दुसरा मृत तरुण आरव तलवार हा 'पॅपी स्वीट्स'च्या मालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Honey Singh nephew Vidit Olak and his friend passes away
Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

नेमका कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधरमधील पोलीस लाईन्स परिसरातील फ्लायओव्हरवर हा अपघात झाला. विदित ओलाक आणि आरव तलवार हे दोघे फोक्सवॅगन कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महानगरपालिकेच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरात धडकली. कार बीएमसी चौकाकडून बीएसएफ चौकाच्या दिशेने जात होती. अपघाताच्या वेळी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी फ्लायओव्हरवर साफसफाई करत होते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली उभी केली होती. याच ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला.

कारमध्ये होते पाच जण

अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत विदित ओलाक आणि आरव तलवार यांचा मृत्यू झाला. तर कारमधील इतर तीन जण आधीच आपापल्या घरी परतले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.