Yetech Aata Me Nandayla: बांदेकरांची सून झळकणार नव्या मालिकेत, लोकप्रिय अभिनेत्यासोबत जमणार जोडी; तारीख अन् वेळ जाहीर!

Yetech Aata Me Nandayla: आदेश बांदेकरांची सून पूजा बिरारी झी मराठीच्या नव्या मालिकेत झळकणार आहे. हर्षद अतकरीसोबत तिची जोडी जमणार असून उषा नाडकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Yetech Aata Me Nandayla
Yetech Aata Me NandaylaSaam Tv
Published On: 

Ye Tech Aata Mi Nandayla: मराठी मनोरंजनविश्वात सध्या नव्या मालिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांच्या भेटीला नवनवीन कथानकं येत असताना झी मराठीनेही एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, आदेश बांदेकर यांची लाडकी सून पूजा बिरारी या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. तिच्यासोबत अभिनेता हर्षद अतकरी प्रमुख भूमिकेत आहे. या कलाकारांची नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘येतेच आता मी नांदायला!’ असं या मालिकेचं नाव असून, मालिकेची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आली आहे.

पूजा बिरारी-हर्षद अतकरीची नवी जोडी

या मालिकेत पूजा बिरारी शिवानीची भूमिका साकारणार आहे, तर हर्षद अतकरी अभ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही अभ्यासात हुशार, शिस्तप्रिय आणि आपल्या करिअरबाबत महत्त्वाकांक्षी असलेली मुलगी आहे. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं तिचं स्वप्न आहे. दुसरीकडे अभ्या हा ठकुबाईचा नातू असून, तो तब्बल ५० वेळा नापास झाला आहे. मात्र, तरीही गावात त्याची मिरवणूक निघते. त्यामुळे या दोघांचे स्वभाव अगदीच वेगळे आहेत. आता या दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींची जोडी कशी जमणार, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Yetech Aata Me Nandayla
Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: 'तू दाखवून दिलं की तू कोणाशीचं लॉयल नाही'; वीकेंड का वारमध्ये स्काउटवर सलमान खान भडकला

ठकुबाईमुळे शिवानी-अभ्याच्या आयुष्यात येणार ट्विस्ट

‘येतेच आता मी नांदायला!’ या मालिकेची खासियत म्हणजे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ठकुबाईची भूमिका साकारणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छोट्या पडद्यावरील कमबॅकची चर्चा रंगली होती. अखेर झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात नव्या मालिकेची घोषणा करत त्यांच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ठकुबाई ही अभ्याची आजी असून, आपल्या नातवासाठी आपल्याला हवी तशीच सून शोधण्याचा तिचा निर्धार आहे. त्यामुळे शिवानी आणि अभ्याच्या नात्यात ठकुबाईची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Yetech Aata Me Nandayla
Famous Director Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; बाथरुममध्ये पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

कधी आणि कुठे पाहता येणार नवी मालिका?

‘येतेच आता मी नांदायला!’ ही मालिका येत्या ३० नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता झी मराठीवर ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. दरम्यान, सध्या रात्री १० वाजता झी मराठीवर किरण गायकवाडची ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे नव्या मालिकेच्या आगमनामुळे ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. २७ नोव्हेंबरला ही मालिका निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत वाहिनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.