Hardik-Natasha Divorce: हार्दिक-नताशा घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट; नताशाला मिळणार 70 % प्रॉपर्टी?
Hardik-Natasha Divorce

Hardik-Natasha Divorce: हार्दिक-नताशा घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट; नताशाला मिळणार 70 % प्रॉपर्टी?

Hardik-Natasha Divorce: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यामागे संकटांचं शुक्लकाष्ट लागलंय. आधी मुंबई इंडियन्सने खाल्लेला सपाटून मार आणि त्यानंतर नताशासोबतच्या घटस्फोटाची चर्चा. मात्र याच नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट आलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.
Published on

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यामागे संकटांची मालिका सुरूच आहे. हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं सपाटून मार खाल्ला. त्यातून हार्दिक सावरत नाही तोवर त्याच्या घटस्फोटाची चर्चा जोरात रंगलीय. हार्दिक आणि नताशा स्टेन्कोविकच्या क्लबमधील ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. एवढंच नव्हे तर लग्नाआधीच नताशा गरोदर झाल्यानं ती चर्चेत आली होती.

मात्र 2020 मध्ये हार्दिक-नताशा या जोडीच्या घरात अगस्त या नव्या पाहूण्याचं स्वागत झालं. तर हार्दिक आणि नताशाने 2023 मध्ये हिंदू आणि ख्रिस्ती अशा दोन्ही पद्धतीने धूमधडाक्यात लग्न केलं. पण आता हेच लग्न मोडण्याची चर्चा रंगलीय. मात्र ही चर्चा सुरु असतानाच हार्दिकने 2017 मध्ये गौरव कपूरला दिलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात त्याने आपल्या प्रॉपर्टीबाबत मोठा खुलासा केलाय. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.

काय म्हणाला हार्दिक पंड्या

मेरी कार, मेरा घर और भी सब कुछ. मैंने कहा कि मैं मेरे नाम पर नहीं लूंगा. आगे जाकर मुझे किसी को 50 प्रतिशत हिस्सा नहीं देना है. (माझी कार, माझे घर आणि इतर सर्व काही. मी ते माझ्या नावावर घेणार नाही असे सांगितले. पुढे जाऊन मला ५० टक्के वाटा कोणाला द्यायचा नाही.)

हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार असल्याने त्याच्या प्रॉपर्टीबाबत अनेकांना उत्सुकता लागलीय. त्यामुळे हार्दिकची प्रॉपर्टी किती आहे पाहूयात.

हार्दिच्या संपत्तीचा सातबारा

2024 मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिकला 15 कोटीत खरेदी केलं.

हार्दिक पंड्या जाहिरात करण्यासाठी 1 कोटी घेतो.

ब्रँड एन्डॉर्समेंटमधून पंड्याला 55-60 लाख रुपये मिळतात.

हार्दिक पंड्याकडे वडोदरा येथे 3.6 कोटींचं पेन्टहाऊस आहे.

वांद्र्यात हार्दिक पंड्याचं अलिशान अपार्टमेंट आहे. हार्दिक पंड्याची एकूण 91 कोटींची संपत्ती आहे. मात्र हार्दिक पंड्याने आपली संपत्ती आईच्या नावे केली नसल्यास 63कोटी रुपये नताशाला द्यावे लागू शकतात.

अॅमेझॉनच्या जेफ बेझोससारख्या अनेक दिग्गजांना घटस्फोटामुळे मोठी संपत्ती गमवावी लागलीय. मात्र हार्दिकने घटस्फोटापुर्वीच आपली संपत्ती आईच्या नावावर करून मोठं ट्रम्प कार्ड खेळलंय. आता जर नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झाला तर नताशाच्या हाती जास्त काही लागणार नाही. त्यामुळे या प्रकरणात काय होणार याचीच उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलीय.

Hardik-Natasha Divorce: हार्दिक-नताशा घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट; नताशाला मिळणार 70 % प्रॉपर्टी?
T-20 World Cup 2024: हार्दिक पंड्या टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार नाही; समोर आलं मोठं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com