Rajkot Gaming Zone Fire: सुखी संसाराची स्वप्ने बेचिराख, १० दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या दाम्पत्याचा चटका लावणारा अंत

Rajkot Gaming Zone Fire News Update: गुजरातमधील शनिवारी दुपारी शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत आता एका नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे.
Rajkot Gaming Zone Fire
Rajkot Gaming Zone FireGoogle

गुजरातमधील शनिवारी दुपारी शॉपिंग मॉलमधील गेम झोनमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत आता एका नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाला आहे. या दोघांसोबतच नवरीच्या बहिणीचा देखील मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

अक्षय ढोलरिया आणि त्याची पत्नी ख्याती असे मृत जोडप्याचे नाव आहे. हे दोघेही ख्यातीची बहीण हरिताच्या लग्नाचे सेलिब्रेशन करण्यासाठी टाइम झोनमध्ये गेले होते. तेथे अचानक लागलेल्या आगीत या तिघांचाही मृत्यू झाला आहे. अक्षय हा कॅनडात शिकत होता.

अक्षयच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, याचवर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचे हिंदू रितीरिवाजानुसार लग्न होणार होते. परंतु त्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर अमेरिकेत राहणारे अक्षयचे आई वडिला भारतात परतले आहेत. पोलिसांनी या दोघांचीही ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली होती. या दोघांचे डीएनए टेस्ट मॅच झाले. त्यानंतर मृत व्यक्तींची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Rajkot Gaming Zone Fire
Rajkot Game Zone Fire Video: राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये आग कशी लागली?, CCTV फुटेज पाहा!

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये जवळपास ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गेमिंग झोनचे मालक युवराज सिंह सोलंकी, व्यवस्थापक नितीन जैन आणि मॅनेजर राहुल राठोडला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी गुजरात पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.

Rajkot Gaming Zone Fire
Manoj Pandey: लष्करप्रमुख जनरल पांडे यांना सेवेत मुदतवाढ; कोण आहेत मनोज पांडे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com