Manoj Pandey: लष्करप्रमुख जनरल पांडे यांना सेवेत मुदतवाढ; कोण आहेत मनोज पांडे?

Who is Army Chief General Manoj Pande: मनोज पांडे यांची सेवानिवृत्तीची तारीख ३१ मे २०२४ होती, ती एक महिन्याने म्हणजेच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलीय. मनोज पांडे यांची ३० एप्रिल २०२२ रोजी सीओएएस म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. मनोज पांडे कोण आहेत ते जाणून घेऊ.
Manoj Pandey:  लष्करप्रमुख जनरल पांडे यांना सेवेत मुदतवाढ; कोण आहेत मनोज पांडे?
Who is Army Chief General Manoj Pandeone india

लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आज लष्करप्रमुखांच्या सेवेच्या मुदतवाढीला मंजुरी दिली. पांडे यांची सेवानिवृत्तीची तारीख ३१ मे २०२४ होती, ती एक महिन्याने म्हणजेच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलीय. मनोज पांडे यांची ३० एप्रिल २०२२ रोजी सीओएएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हाती आलेल्या वृत्तानुसार रविवारी संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीचे एक निवेदन जारी केलं. यात जनरल पांडे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते, मात्र आता ते ३० जून रोजी निवृत्त होणार असल्याचे सांगण्यात आलं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करी नियम १९५४ च्या नियम १६A (4) अंतर्गत हा निर्णय घेतला. नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, पांडे यांची डिसेंबर १९८२ मध्ये आर्मी इंजिनीअर कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली होती. लष्करप्रमुख होण्यापूर्वी ते लष्कर उपप्रमुख होते.

जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलीत. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच पांडे यांनी अंदमान निकोबार कमांडचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. ते जून २०२० ते मे २०२१ पर्यंत अंदमान निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते. इतकेच नाही तर मनोज पांडे यांनी पश्चिम लडाखच्या उंच प्रदेशात पर्वतीय विभाग आणि ईशान्येकडील एका सैन्यदलाचे नेतृत्व केलंय.

मनोज पांडे यांनी इथिओपिया आणि इरिट्रिया येथील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणूनही काम केलंय. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, लष्करप्रमुखांचे प्रशस्तीपत्र इत्यादींनी सन्मानित करण्यात आलंय.

Manoj Pandey:  लष्करप्रमुख जनरल पांडे यांना सेवेत मुदतवाढ; कोण आहेत मनोज पांडे?
Naxalites Encounter: छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com