PM Kisan: भोंगळ कारभार! अमरावतीमधील PM Kisan लाभार्थ्यांचे पैसे गेले जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात
PM Kisan AmravatiGoogle

PM Kisan: भोंगळ कारभार! अमरावतीमधील PM Kisan लाभार्थ्यांचे पैसे गेले जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात

PM Kisan: अमरावती जिल्ह्यातील शहापूर गावातील ८२ शेतकऱ्यांचं दोन वर्षांचे अनुदान चक्क जम्मू काश्मीरच्या शहापूर गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.

(अमर घटारे, अमरावती)

अमरावती: शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पीएम किसान योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. परंतु सरकारी बाबूंच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थी आर्थिक मदतीपासून वंचित राहत आहेत. याचा प्रत्यय अमरावतीमधील सरकारी बाबूंचा भोंगळ कारभार समोर आलाय.

पीएम किसान योजनेचे लाभार्थी अमरावतीमधील शहापूरचे आणि पैसे गेले जम्मू-काश्मीरमधील शहापूरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात. ही घोळ झालाय अमरावतीमधील सरकारी बाबूंच्या भोंगळ कारभारामुळे. अमरावती जिल्ह्यातील शहापूर गावातील ८२ शेतकऱ्यांचं दोन वर्षांचे अनुदान चक्क जम्मू काश्मीरच्या शहापूर गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. याप्रकरणाची तक्रार काही शेतकऱ्यांनी आज बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला १२ हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना दिल्या जाते. मात्र गेल्या २ वर्षांपासून अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर तालुक्यातील शहापूर गावातील ८२ शेतकऱ्यांचे अनुदान चक्क जम्मू काश्मीर येथील शहापूर गावात जात असल्याच समोर आलं आहे. ज्या कोडवर पैसे जमा होत अहे ते जम्मू काश्मीर येथील JK असा कोड आहे. तेथील शहापूर गावात जात आहे,अमरावती जिल्ह्यातील शेतकरी गेल्या २ वर्षांपासून तक्रार करत आहे. मात्र ते पैसे जाते कुठे हे कळत नव्हतं.

आज अखेर ते जम्मू काश्मीरला जात असल्याचा समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अनुदान जम्मू काश्मीरला असं होऊ, नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. दरम्यान याबाबतचा प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करू असे सुद्धा बच्चू कडूंनी सांगितले आहे.

दरम्यान बीडमधील शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याचा प्रकार समोर आला होता. बीड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय. पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे बीड तालुक्यातील अनेक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे बीड तालुक्यातील शेकडो शेतकरी तालुका कृषी अधिकारी अधिकारी कार्यालयात धडकले होते. या ठिकाणी लँड सिडिंग नसणे, ई केवायसी नसणे, डीबीटी अनेबल यासह अनेक समस्या पंतप्रधान किसन सन्मान योजनेत येत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वारंवार फेऱ्या मारून देखील दुरुस्ती होत नसल्याचं सांगितलं जात होतं.

PM Kisan: भोंगळ कारभार! अमरावतीमधील PM Kisan लाभार्थ्यांचे पैसे गेले जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यात
PM Kisan Yojana : एकाच घरातील दोन सदस्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेता येईल का? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com