Naxalites Encounter: छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Naxalites Killed In Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
छत्तीसगडमध्ये  नक्षलवाद्यांचा खात्मा
Naxalites EncounterSaam Tv

छत्तीसगडमध्ये २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. २३ मे रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी नारायणपूर-विजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर सात नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा जवानांना प्लाटून क्रमांक १६ आणि इंद्रावती एरिया कमिटीचे नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ऑपरेशन सूर्यशक्ती पॉइंट ५ सुरू करण्यात आलं होतं.

नारायणपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रभात कुमार यांनी आज तकला दिलेल्या माहितीनुसार , सकाळी ११ वाजेच्या सुमारास नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील डीआरजी आणि बस्तर सैनिकांसह एसटीएफ पथके संयुक्त नक्षल गस्त शोधमोहिमेवर निघाली होती. तेव्हा त्यांच्यात अचानक चकमक सुरू झाली. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू (Naxalites Killed In Encounter In Chhattisgarh) केला. त्यानंतर सैनिकांनीही गोळीबार सुरू केला. त्यांच्यात अधूनमधून चकमक सुरूच राहिली. त्यानंतर जंगलात झडतीदरम्यान सात गणवेशधारी नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे सापडली आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाले असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

या घटनेमुळे राज्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत १०७ नक्षलवादी ठार (Naxalites Killed) झाल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स आणि दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्यांच्या विशेष टास्क फोर्ससह राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या सहभाग झाली होत्या. ३० एप्रिल रोजी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह दहा नक्षलवादी तर १६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी २९ नक्षलवादी, १० मे रोजी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले (Naxalites Encounter) होते.

छत्तीसगडमध्ये  नक्षलवाद्यांचा खात्मा
Chhattisgarh Encounter: कांकेरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये सहाव्या टप्प्यात मतदान होत (Chhattisgarh News) आहे. २५ मे रोजी झारखंडमधील गिरिडीह, धनबाद, रांची आणि जमशेदपूर या चार लोकसभा जागांवर सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी एकूण ९३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी गिरीडीह १६, धनबाद २५, रांची २७ आणि जमशेदपूरमधून २५ उमेदवार आहेत. यावेळी ४०.०९ लाख महिलांसह ८२ लाखांहून अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत.

छत्तीसगडमध्ये  नक्षलवाद्यांचा खात्मा
Chhattisgarh Naxalite Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, नारायणपूरमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com