वर्षभरात मराठी मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप
शेवटच्या भागाचा खास प्रोमो आला समोर
मालिका संपणार असल्याने कलाकार भावुक
स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिका पाहायला मिळत आहे. प्रेक्षकही मालिकांना चांगला प्रतिसाद देत आहेत. अशात एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी ७ जुलै २०२५ रोजी 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका सुरू झाली होती. आता वर्ष पूर्ण झाल्यावर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर हे मुख्य भूमिकेत आहेत. कृष्णा आणि दृष्यंतच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. नुकताच मालिकेचा शेवटच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. यावर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कृष्णा तुळशीची पूजा करत असते. तेवढ्यात तिला चक्कर येते. दृष्यंत तिला सावरतो आणि डॉक्टरांना बोलवतो. त्यानंतर डॉक्टर घरच्यांना कृष्णा गरोदर असल्याची बातमी देतात. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. तेव्हा कृष्णा सासू-सासऱ्यांना म्हणते की, "या नात्यातले अंतर आता मिटवून टाका आबा...तुम्ही दोघांनी पुन्हा लग्न करून आयुष्याला नव्याने सुरुवात करा. माझ्या बाळाने त्यांच्या आजी आजोबांना एकत्र पहावे अशी माझी इच्छा आहे. " असे बोलून कृष्णा सासू-सासऱ्यांचे हात हातात घेते. त्यानंतर हे कुटुंब आनंदाने हसताना दिसते.
मालिकेच्या प्रोमोला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "गोड बातमी देऊन कृष्णा कुटुंबाला एकत्र आणणार..." 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेचा अंतिम भाग शनिवार ८ ऑगस्ट दु. १.०० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. मालिकेच्या संपण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
१० ऑगस्टपासून ऐश्वर्या नारकर यांची नवीन मालिका 'आमच्या लाडक्या नाईक बाई' सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.