Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, नेमकं झालं काय?

Rashmika Mandanna Injury : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला गंभीर दुःखापत झाली आहे. शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Rashmika Mandanna Injury
Rashmika Mandannasaam tv
Published On
Summary

रश्मिका मंदान्नाच्या चाहत्यांना धक्का

शूटिंगदरम्यान अभिनेत्री गंभीर जखमी

चित्रपटाचे शूटिंग थांबले

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर रश्मिका मंदानाला गंभीर दुःखापत झाली आहे. रश्मिकाला दुःखापत झाल्याचे समजताच चाहते चिंतेत पडले आहेत. चाहते सोशल मीडियावरून ती लवकर बरी व्हावी आणि यातून रिकव्हर व्हावी यासाठी प्रार्थना करताना आणि शुभेच्छा देताना दिसत आहेत.

TOI च्या वृत्तानुसार, रश्मिका मंदानाला तिच्या आगामी चित्रपटातील एका कठीण डान्स सिक्वेन्स चे शूटिंग करत असताना ही दुखापत झाली. डान्समध्ये ॲक्शन सीनचे शूट करताना तिच्या कमरेकडील भागातील एक 'टेंडन' (स्नायूचे हाडाशी जोडणारे तंतू) पूर्णपणे फाटल्याचे समजते. डॉक्टरांनाही सांगितल्यानुसार, टेंडनला अशा प्रकारची इजा सहसा कठोर प्रशिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक खेळाडूंमध्ये अधिक दिसून येते. तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, काळजीपूर्वक आखलेला रिहॅबिलिटेशन प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी तिला सहा आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Rashmika Mandanna Injury
Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्री सायबर क्राइमची शिकार, काही मिनिटांत अकाउंटमधून लाखो लंपास

रश्मिकाला ही दुखापत अचानक झाली असून, त्याचा परिणाम आगामी आठवड्यांच्या कामांवर होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री अनेक जाहिरातीत काम करत आहे. तसेच 'रणबाली' (Ranabaali) व 'मिसा' (Mysaa) यांसारख्या काही मोठ्या बजेटच्या चित्रपटांवर काम करत आहे. आता तिला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्यामुळे, तिचे चालू असलेले शूटिंग आणि व्यावसायिक कामांचे वेळापत्रक कदाचित बदलावे लागू शकते. रश्मिका आणि तिच्या टीमने या वृत्तांवर अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही.

रश्मिका मंदानाने साऊथ सोबतच आता बॉलिवूडमध्ये देखील आपली छाप उमटवली आहे. अलिकडेच रश्मिका शाहिद कपूर, कृती सेनॉनसोबत 'कॉकटेल २' या चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com