बॉलिवूड अभिनेता गंभीर जखमी
हाताला झाली दुखापत
अंथरुणावरून उठतानाही होतोय त्रास
बॉलिवूड अभिनेते पीयूष मिश्रा सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'दुल्हनिया ले आएगी'मुळे चांगलेच चर्चेत आहे. अशात त्यांच्या अपघाताविषयीची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक पीयूष मिश्रा यांच्यासोबत घरात एक घटना घडली. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक आकाशादित्य लामा यांनी केली आहे.
ई२४ बॉलीवूडच्या वृत्तानुसार, अभिनेते पीयूष मिश्रा बाथरूममध्ये घसरून पडले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.मंगळवार (२१ जुलै २०२६) रोजी मुंबईत 'दुल्हनिया ले आएगी' या चित्रपटाचा प्रमोशनल सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूड स्टार पीयूष मिश्रा, दिग्दर्शक आकाशादित्य लामा आणि अभिनेत्री खुशाली कुमार उपस्थित राहणार होते. मात्र, पीयूष मिश्रा यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, दिग्दर्शक आकाशादित्य लामा यांनी सांगितले की, "सोमवारी रात्री पीयूष मिश्रा बाथरूममध्ये घसरून जखमी झाले. त्यांच्या एका हाताला फ्रॅक्चर झाले असून, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पीयूष मिश्रा सध्या पूर्ण विश्रांतीवर असून चित्रपटाशी संबंधित सर्व प्रमोशन आणि कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. पीयूष मिश्राला अंथरुणावरून उठणेही कठीण झाले आहे."
लामा यांनी स्पष्ट केले की, त्यांना काल रात्री पीयूष मिश्रा यांच्या मॅनेजरचा फोन आला होता. मॅनेजरने त्यांना सांगितले की, पीयूष मिश्रा बाथरूममध्ये पडल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे ते आता चित्रपटाच्या प्रमोशन आणि मुलाखतींमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
आकाशादित्य लामा यांच्या 'दुल्हनिया ले आएगी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रोमान्स, कॉमेडी आणि ड्रामाने भरलेल्या या चित्रपटात लग्नातील गोंधळ आणि अनेक रंजक वळणे आहेत. पीयूष मिश्रा यांच्या व्यतिरिक्त, या चित्रपटात खुशाली कुमार, महेश मांजरेकर, लॅरिसा बोनेसी, ओंकार कपूर, स्नेहिल दीक्षित मेहरा आणि अगु स्टॅनली चिडोझी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'दुल्हनिया ले आएगी' चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.