पोलिसांचा आंदोलकांवर जबर लाठीचार्ज, जखमी विद्यार्थिनीची मृत्यूशी झुंज?

Brutal Crackdown in Delhi: CJPच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला... मात्र याचं लाठीचार्जमध्ये एक विद्यार्थीनी गंभीर जखमी झालीय. मोठा मार लागल्याने ही विद्यार्थीनी मृत्यूशी झुंज देतेय. सत्ताधारी तरुणांवर कसा दबाव आणतायत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
A student lies injured after a violent police lathi charge during a protest at Parliament Street in Delhi.
A student lies injured after a violent police lathi charge during a protest at Parliament Street in Delhi.saam tv
Published On

दिल्लीत पोलिसांनी तरुणांवर निर्दयीपणे केलेला लाठीचार पाहून पूर्ण देशाच्या अंगावर काटा आलाय! मागचा-पुढचा कसलाही विचार न करता निष्पाप विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठ्या-काठ्या चालवल्या गेल्या, त्यानं अख्खा देश हादरलाय. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या तरुण-तरुणींना अक्षरशः गुराढोरांनाही मारत नाही तसं बेदम मारलं. यातच पोलिसांच्या हल्ल्यात एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय. या मुलीला काही झालं तर मोदी आणि पोलीस जबाबदार असतील असा आरोप अभिजीत दिपकेंनी केलाय.

कालपर्यंत आपल्या हक्कासाठी व्यवस्थेशी भिडणारी एक तरुणी आज हॉस्पिटलमध्ये मृत्यू सोबत झुंज देतेय. पण ही फक्त एका मुलीची कहाणी नाही; काल भरदिवसा दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांनी ना आव पाहिला ना ताव आपल्या लाठ्या काठ्यांनी मुलींनाही बडवलं...अनेक मुली रक्तानं माखलेल्या होत्या. एका-एका आंदोलकाला पाच-पाच, सहा-सहा पोलिसांनी घेरून तुडवून तुडवून मारलं.

काल फक्त काठ्यांचे जबर फटके... पाठीवर उठलेले व्रण... आणि डोक्यातून वाहणारं रक्त....अशा अवस्थेत या अमानुष अत्याचाराविरोधात या मुली धाय मोकलून रडत होत्या...अंगावर शहारे आणणारं चित्र दिल्लीच्या संसद मार्गावर होतं.

पोलिसांच्या समोरच विद्यार्थ्यांवर अमानूष अत्याचार करणाऱ्या या पोलिसांना जेव्हा विद्यार्थ्यांनी जाब विचारला तेव्हा मात्र त्यांची बोलती बंद झाल्याचं दिसलं. दिल्लीत पोलिसांनी ज्या थराला जाऊन दडपशाही केली, त्यावरून प्रश्न पडतोय की हे पोलिस जमाव पांगवायला आले होते की विद्यार्थ्यांचा जीव घ्यायला? ज्यांच्या हातात संरक्षण करायची जबाबदारी आहे, तेच पोलिस स्वतः हातात दगडं घेऊन विद्यार्थ्यांवर भिरकावतांना दिसले...एवढंच नाही, तर शांततेत चालणाऱ्या तरुणांना पायात पाय घालून पाडायचं आणि खाली पडल्यावर त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवायचं, हे पोलिसांचे कृत्यही कॅमेऱ्यात कैद झालंय.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारण्यासाठी काठ्यांना खिळे ठोकलेल्या काठ्या घेतल्या होत्या हे दृष्य समोर आलं तेव्हा तर पोलिसांनी क्रौर्याच्या सर्वच सीमा पार केल्याचं दिसलं....भारताच्या उज्ज्वल भविष्यावर, या देशाच्या तरुणाईवर झालेला हा हल्ला इतका भयानक होता की दिल्लीचे रस्ते विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले होते. पोलिसांचं हे क्रूर रूप जनरल डायरला ही लाजवेल असंच होतं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com