Govinda Son : गोविंदाचा लेक गाजवणार बॉलिवूड; पहिल्या चित्रपटाचं मोठं अपडेट समोर, नाव अन् रिलीज डेट काय?

Yashvardhan Ahuja Bollywood Debut : बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाचा लेक आता चित्रपटात दिसणार आहे. यशवर्धन आहुजाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
Yashvardhan Ahuja Bollywood Debut
Govinda Son SAAM TV
Published On
Summary

गोविंदाच्या लेकाचा पहिला चित्रपट येणार

यशवर्धन आहुजाचा दमदार बॉलिवूड डेब्यू

चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर

बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेले काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. अशात आता गोविंदाचा मुलगा बापाच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात एन्ट्री करत आहे. गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाच्या पहिल्या चित्रपटासंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटासंबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.

X वर taran adarsh यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गोविंदाचा लेक 'हिरो की हिरोईन' (Hero Ki Horrorine) या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक साजिद खान यांचेही रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे.या चित्रपटात नितांशी गोयल, सुनीता आहुजा, जेमी लेव्हर, चंकी पांडे, बृजेंद्र काला आणि सिमरत कौर रंधावा यांसारखे मोठे कलाकार आहेत.

'हिरो की हिरोईन' या चित्रपटात कॉमेडी, हॉरर आणि रोमान्स यांचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे. यशवर्धन आहुजासोबत अभिनेत्री नितांशी गोयल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि अमर बुटाला यांनी साजिद खान यांच्यासोबत मिळून केली आहे. 'हिरो की हिरोईन' हा चित्रपट ७ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Yashvardhan Ahuja Bollywood Debut
Bollywood Actor : केअरटेकरची मदत, हातात काठी; बॉलिवूड सुपरस्टारची 'अशी' अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO होतोय तुफान व्हायरल

गोविंदाच्या लेकाचा चित्रपट येणार समजताच सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांना दोन मुलं आहेत. यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा टीना आहुजाने 2015 मध्ये स्मीप कांग दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी चित्रपट सेकंड हँड हसबंडमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात तिने गिप्पी ग्रेवाल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com