Bollywood Actor : ३३ वर्षीय अभिनेत्याने साकारली १६ वर्षांच्या मुलाची भूमिका, बॉलिवूडचा 'हा' हिरो आहे तरी कोण?

Kartavya - Yudhvir Ahlawat Age : बॉलिवूडच्या ३३ वर्षीय अभिनेत्याने एका चित्रपटात १६ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली. हा अभिनेता आहे तरी कोण, जाणून घेऊयात.
Kartavya - Yudhvir Ahlawat Age
Bollywood ActorSAAM TV
Published On
Summary

सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडच्या एका हिरोची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.

३३ वर्षीय अभिनेत्याने १६ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली.

अभिनेत्याने अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान सध्या त्याच्या 'कर्तव्य' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'कर्तव्य' मध्ये सैफ अली खान पोलीसांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेता युधवीर अहलावत झळकला. त्याने चित्रपटात 'हरपाल' हे पात्र साकारले जे किशोरवयीन मुलाचे आहे. अनेकांना हा युधवीर अहलावत खऱ्या आयुष्यातही लहान किशोरवयीन मुलगा वाटला, मात्र तसेच नसून तो ३३ वर्षांचा पुरुष आहे. अभिनेता सैफ अली खान देखील युधवीरला सुरूवातीला लहान मुलगा समजला होता.

'कडक' (Kadak) ला दिलेल्या मुलाखतीत युधवीर म्हणाला की, मला खूपच छान वाटतंय. लोकांना माझं काम आवडलं आहे, असे मेसेजेस ते मला पाठवत आहेत. मी याच दिवसाची वाट पाहत होतो. मी सतत प्रत्येकाच्या मेसेजेसना (DMs) उत्तर देत आहे.रेड चिलीजसोबत काम करण्याची ही माझी दुसरी वेळ आहे आणि अनुभव खूपच छान होता. मुकेश छाब्रा यांच्या टीमकडून मला फोन आला की ते 'कर्तव्य' नावाच्या चित्रपटासाठी कास्टिंग करत आहेत आणि त्यांना 'हरपाल'च्या भूमिकेसाठी माझी ऑडिशन घ्यायची आहे. मी ऑडिशन दिली आणि एक-दोन टेक्सनंतर त्यांनी मला सांगितले की, मी चांगली कामगिरी केली आहे. कुठेतरी मलाही वाटले होते की हा चित्रपट मीच करेन. एका आठवड्यानंतर, मला रेड चिलीजकडून फोन आला आणि त्यांनी सांगितले की या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे."

अभिनेता पुढे म्हणाला की, "मी तरुण दिसतो म्हणून माझे कौतुक व्हायचे, विशेषता महिला चाहत्यांकडून... ती लोक मला क्यूट बोलायचे. एका मुलाखतीत सैफ सरांना चित्रपटातील त्यांच्या आवडत्या दृश्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यांनी माझे कौतुक करताना म्हटले, 'हरपाल खूप छान काम करतो. मी त्याच्यासोबत १६ वर्षांचा मुलगा समजून वागायचो. पण मग पुलकित सरांनी (दिग्दर्शक) सांगितले की मी प्रत्यक्षात ३३ वर्षांचा आहे. हे ऐकून त्यांना धक्काच बसला.' ती क्लिप खूप व्हायरल झाली होती..."

शेवटी युधवीर म्हणाला की, "सुरुवातीला सगळे माझ्याशी एखाद्या बालकलाकारासारखेच वागायचे. नंतर पुलकित सरांनी सर्वांना सांगितले की मी प्रत्यक्षात ३३ वर्षांचा आहे. त्यानंतर संजय मिश्रा सर आणि इतर लोकांनी माझ्याशी एखाद्या प्रौढ कलाकाराप्रमाणे वागायला सुरुवात केली..." युधवीर अहलावतच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Kartavya - Yudhvir Ahlawat Age
Famous Actress : २ दिवस सहन केलं, तिसऱ्या दिवशी दगड उचलला अन् डोकं फोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला छेडछाडीचा थरारक अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com