Sunil Grover: फुटपाथवर झोपलेला दिसला प्रसिद्ध अभिनेता; व्हिडिओ पाहून चाहते हैरान, म्हणाले, 'अहंकार नसल्यावर...'

Sunil Grover: ऋषिकेशच्या त्रिवेणी घाटावर फुटपाथवर झोपलेल्या सुनील ग्रोव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या साधेपणाचे चाहते सोशल मिडियावर भरभरून कौतुक करत आहेत.
Sunil Grover
Sunil GroverSaa Tv
Published On

Sunil Grover: अभिनेता आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच साधेपणासाठीही ओळखला जातो. ग्लॅमरच्या दुनियेत मोठं नाव कमावूनही सुनील अनेकदा आपल्या साध्या राहण्यामुळे सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुनील ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटावरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो काही तिथल्या लोकांप्रमाणेच फुटपाथावर झोपलेला दिसत आहे. यावेळी त्यांने साधे कपडे घातले आहेत. तर, त्याने एक साधी चादर अंथरली असून त्याच्या जवळ त्याची चप्पल ठेवली आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करताना त्याने ''जलकाल महाकाल'' हे गाणं बॅकग्राऊंडला ठेवलं असून "तारे जमीन पर" असे कॅप्शन दिले आहे.

Sunil Grover
Singer Death: प्रसिद्ध गायकाचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; संगीत विश्वात शोककळा

व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अनेकांनी सुनीलच्या साधेपणाचे आणि नम्र स्वभावाचे कौतुक करत त्याला ‘जमिनीशी जोडलेला कलाकार’ असे म्हटले आहे. एका चाहत्याने, 'एक उत्तम माणूस आणि माझा आवडता कलाकार,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “म्हणूनच सर्वजण तुझ्यावर प्रेम करतात,” असे म्हटले. आणखी एका चाहत्याने, “इतकी प्रसिद्धी आणि संपत्ती असूनही अहंकाराचा लवलेश नाही,” तर, आणखी एक नेटकरी म्हणाला, ''अहंकार नसल्यावर शांती आणि समाधन देखील आपल्यासोबत असतंं'' असे म्हणत त्याचे कौतुक केले.

Sunil Grover
Dia Mirza: 'हवामान बदलाला पुरुषच जबाबदार'; दिया मिर्झाच्या विधानावरून वादाची ठिणगी उडाली, स्पष्टीकरण देत म्हणाली...

सुनील ग्रोव्हर याआधीही अशाच अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. कधी तो रस्त्याच्या कडेला उसाचा रस काढताना दिसला, तर कधी त्याने चहाच्या टपरीवर चहा बनवला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो इस्त्रीवाल्याच्या दुकानात कोळशावर चालणाऱ्या इस्त्रीने कपड्यांना इस्त्री करताना दिसला होता.

दरम्यान, सुनील ग्रोव्हर सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे चर्चेत आहे. शोमध्ये त्याने विविध सेलिब्रिटींच्या मिमिक्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. मात्र पडद्यावरील हा कलाकाराच्या तितकाच साधा आणि विनम्र असल्याने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com