Bollywood Actor : केअरटेकरची मदत, हातात काठी; बॉलिवूड सुपरस्टारची 'अशी' अवस्था पाहून चाहते चिंतेत, VIDEO होतोय तुफान व्हायरल

Bollywood Actor Viral Video : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेता काठीच्या सहाय्याने चालताना दिसत आहे. अभिनेत्याला नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Bollywood Actor Viral Video
Bollywood Actor SAAM TV
Published On
Summary

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

अभिनेता काठीच्या आधाराने चालताना दिसतोय

बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून चाहते थक्क झाले आहेत. हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. '3 इडियट्स' या सुपरहिट चित्रपटात काम केलेले अभिनेते परीक्षित साहनी (Parikshit Sahni) यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर होते. अलिकडेच, त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात त्यांच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण झाली.

परीक्षित साहनी यांना आपल्या भन्नाट अभिनयाने चाहत्यांना वेड लावले. त्यांचे वडील प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते बलराज साहनी होते. आपल्या वडिलांप्रमाणेच, परीक्षित साहनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी राजकुमार हिरानी यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजल्या आहेत.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

अभिनेते परीक्षित साहनी आता जवळपास 82 वर्षांचे आहेत. अलिडेच पापाराझींनी त्यांना केअरटेकरच्या मदतीने त्यांच्या इमारतीबाहेर फिरताना स्पॉट केले. त्यांच्या हातात एक काठी होती, ज्याच्या सहाय्याने ते चालताना दिसले. अभिनेत्याने पायजमा आणि टी-शर्ट घातला होता. डोक्यावर लाल टोपी होती. वयोमानानुसार त्यांची तब्येत अशी झाल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यावर नेटकरी तुफान कमेंट्स करत आहेत.

Bollywood Actor Viral Video
Prajakta Mali : रेशीमगाठ अजूनच घट्ट होणार; प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र, VIDEO शेअर करत दिली गुडन्यूज

नेटकरी कमेंट्समध्ये अभिनेत्याला तब्येतीची काळजी घ्यायला सांगत आहेत. तर काहींना त्यांचा हा व्हिडीओ पाहून '3 इडियट्स'मधील त्यांची भूमिका आठवली. परीक्षित साहनीने राजकुमार हिरानी यांच्या 'लगे रहो मुन्ना भाई', '3 इडियट्स' आणि 'पीके' या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. ते राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटातही दिसले होते.परीक्षित साहनीने सर्वप्रथम 'मेरा नाम जोकर' या चित्रपटात राज कपूर यांचा सहाय्यक म्हणून काम केले. नंतर ते अभिनयात सक्रिय झाले. 'गुल गुलशन गुलफाम' या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com