Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे प्राचीन भारतातील महान अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यात गुरु होते.
चाणक्य नितीमध्ये आयुष्य, संबंध, नाती प्रेम आणि समाजयावर अनेक विचार दिले आहेत.
पुढे आपण चाणक्यांनी प्रेमाबाबतचे सांगितलेले विचार सांगितले आहेत.
चाणक्य म्हणतात की प्रेमात इतकं अंध होऊ नये की समोरच्याच्या चुकीच्या गोष्टीही योग्य वाटायला लागतात.
विश्वास महत्त्वाचा आहे, पण अंधश्रद्धा नाही. व्यक्ती परीक्षित असावी.
चाणक्य सांगतात की प्रेमात उतावळेपणा नुकसानदायक असतो. संयम ठेवल्याने नातं टिकतं.
प्रेमाच्या नात्यातही स्वाभिमान महत्त्वाचा आहे. तो कायम ठेवावा.
फक्त बाह्य सौंदर्यावर प्रेम करणे चुकीचे आहे, मन आणि विचार यांचे जुळणं आवश्यक आहे.
प्रेमात जर केवळ वेदना आणि अपमान मिळत असेल तर ते नातं तोडणंच योग्य.