Prajakta Mali : रेशीमगाठ अजूनच घट्ट होणार; प्राजक्ता माळी-ललित प्रभाकर पुन्हा एकत्र, VIDEO शेअर करत दिली गुडन्यूज

Prajakta Mali - Lalit Prabhakar Marathi Movie : लोकप्रिय जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले आहे. सोशल मीडियावर एक खास रोमँटिक व्हिडीओ शेअर करून त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.
Prajakta Mali - Lalit Prabhakar Marathi Movie
Prajakta Mali SAAM TV
Published On
Summary

प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकत्र

तब्बल १३ वर्षांनी 'जुळून येती रेशीमगाठी' चे कपल एकत्र

प्राजक्ता-ललितने चाहत्यांना दिली गुडन्यूज

अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. लोकप्रिय एव्हरग्रीन जोडी आदित्य - मेघना म्हणजेच ललित प्रभाकर-प्राजक्ता माळी पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतीच त्यांच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. ज्याचा खास व्हिडीओ समोर आला आहे. छोट्या पडद्यावरील ही लोकप्रिय जोडी आता तब्बल १३ वर्षांनी थेट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर आता प्राजक्ता-ललितची क्रेझ पाहायला मिळणार. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

प्राजक्ता आणि ललितने एकत्र सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, भर पावसात हिरव्यागार रस्त्यावर ललित गाडीसमोर उभे राहून फोनवर काहीतरी करताना दिसत आहे. तेवढ्यात प्राजक्ता मागून धावत येते तिचा धक्का ललितला लागतो आणि तिचा तोल जातो. प्राजक्ता पडणार तेवढ्यात ललित तिचा हात पकडतो आणि तिला पडण्यापासून वाचतो. दोघे एकमेकांना पाहतच राहतात. त्यानंतर ललित प्राजक्ताला स्वतःकडे ओढतो आणि दोघांच्या चेहऱ्यावर हसू येतो. दोघांची केमिस्ट्री भन्नाट आहे. प्रेक्षक तेच प्रेम आणि तीच केमिस्ट्री पाहून भारावून गेले आहेत.

चित्रपटाचे नाव काय, कधी रिलीज होणार?

प्राजक्ता आणि ललित दोघे 'शुभ मंगलम जोडी दंगलम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आणि आम्ही परत एकत्र आलो...गेली १३ वर्ष हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला आणि तुम्हाला परत प्रेमात पाडायला ही जोडी परत येतेय... The OG Jodi is back या वेळेस गाठी जुळणार थेट destination wedding ला ..." चित्रपटाची ही भन्नाट झलक आणि हटके कॅप्शन पाहून सिनेमात नेमकं काय असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 'शुभ मंगलम जोडी दंगलम' हा चित्रपट १ मे २०२७ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Prajakta Mali - Lalit Prabhakar Marathi Movie
Famous Actress : "आप कहा हैं? ध्यान दीजिये..."; ऑनलाइन फूड ऑर्डरमध्ये झुरळ सापडल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने तुकाराम मुंढेंना फटकारले

प्राजक्ता आणि ललितला चाहते त्यांच्या नवीन चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहे. चित्रपट पाहायला प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका 2013 ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2015ला मालिका संपली. त्यानंतर ही जोडी 2017 साली 'हंपी' (Hampi) या चित्रपटात एकत्र दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com