Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

Lalit Prabhakar: नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ चित्रपटाचे पोस्टर लाँच झाले. ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट 1 ऑक्टोबर 2026 रोजी मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे.
actor Lalit Prabhakar To Play role of Namdeo Dhasal
actor Lalit Prabhakar To Play role of Namdeo DhasalSaam tv
Published On

Lalit Prabhakar: दलित पँथरचे प्रणेते आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबईत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमधून त्यांचा दमदार आणि प्रभावी लूक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ललितचा हा बंडखोर आणि तडफदार अंदाज चित्रपटासाठी मोठं आकर्षण मानलं जात आहे.

actor Lalit Prabhakar To Play role of Namdeo Dhasal
Zanai Bhosle Post: 'सकाळी उठल्यावर कोणाला मिठी मारू?' आशा भोसले यांच्या आठवणीत नात जनाई भावूक; मन हेलावणारी पोस्ट व्हायरल

संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत, वरुणा मदनलाल राणा निर्मित ‘ढसाळ’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन वरुणा राणा यांनी केले असून, संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहेत.

actor Lalit Prabhakar To Play role of Namdeo Dhasal
Lapandav Serial: 'लपंडाव' मालिकेमध्ये रुपाली भोसलेची डबल थरार; तेजस्विनी-मनस्विनीच्या वादात येणार मोठा ट्विस्ट

चित्रपटातून नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळणार आहे. त्यांच्या कवितेतील विद्रोह, अन्यायाविरुद्ध उभारलेला लढा आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे विचार पडद्यावर प्रभावीपणे मांडले जाणार आहेत.

या चित्रपटाला दाक्षिणात्य दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. तसेच हिंदीतील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील आणि मराठीतील गुरु ठाकूर यांनी गाणी लिहिली आहेत. चित्रपटातील ललित प्रभाकर यांचा लूक साकारण्यासाठी प्रख्यात रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

दिग्दर्शिका वरुणा राणा यांनी सांगितले की, “नामदेव ढसाळ हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून एक विचारप्रवाह आहेत. त्यांचा संघर्ष आणि विद्रोह पडद्यावर मांडणे हे मोठे आव्हान होते.” तर ललित प्रभाकरनेही या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचा उल्लेख करत ही भूमिका साकारणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com