Shruti Vilas Kadam
मराठी अभिनेत्रीप्राजक्ता माळीचे तब्बल १३ वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा आणि निरागस लूक पाहायला मिळतो.
आज ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाणारी प्राजक्ता त्या काळात अगदी साध्या व पारंपरिक रूपात दिसत होती. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हा बदल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे फोटो तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील असल्याचे मानले जाते. त्यावेळी ती मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होती.
जुन्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले असून काहींनी तिला "तेव्हाही सुंदर, आताही सुंदर" अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्राजक्ताने नृत्य, अभिनय, सूत्रसंचालन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो.
गेल्या काही वर्षांत प्राजक्ताच्या फिटनेस आणि फॅशन सेन्सचीही मोठी चर्चा झाली. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे.
प्राजक्ताने यापूर्वीही अनेक जुने फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यामुळे तिचे हे थ्रोबॅक फोटो चाहत्यांसाठी खास आहेत