Actor Break on Social Media: 'एक छोटा ब्रेक घेतोय…'; बाबा झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा सोशल मीडियापासून ब्रेक, कारण काय?

Actor Break on Social Media: प्रसिद्ध अभिनेत्याने सोशल मीडियावरून ब्रेक घेतल्याची घोषणा केली. नवीन चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
Actor Break on Social Media
Actor Break on Social MediaSaam Tv
Published On

Actor Break on Social Media: साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता विष्णू विशालने नुकतीच त्याच्या बाळाची बातमी देत तो बाबा झाल्याचे सांगितले होते. त्याच्या या आनंदाच्या बातमीमुळे चाहत्यांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. पण विशालने आता सोशल मीडियापासून काळी काळ लांब राहणअयाचा निर्णय घेतला असून शुक्रवारी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता, निर्माता आणि नुकताच बाबा झालेल्या विष्णू विशाल याने सोशल मीडियापासून काळी काळ लांब राहणअयाचा निर्णय घेतला आहे. ‘वेनिला कबाडी कुझू’, ‘कुल्लनारी कूट्टम’ आणि ब्लॉकबस्टर ‘रातसासन’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विष्णूने शुक्रवारी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे.

Actor Break on Social Media
Dhurandhar 2 Collection: तिसऱ्या शनिवारी, 'धुरंधर २' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; केली इतक्या कोट्यवधींची कमाई

विष्णू विशालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “सोशल मीडियावरून थोडा ब्रेक घेत आहे... लवकरच चित्रपटांच्या अपडेट्स घेऊन परत येईन.” असा मेसेज लिहतं हा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Actor Break on Social Media
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने 'इतकं' वजन केलं कमी; नव्या फोटोशूटसह अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

अभिनेता लवकरच आपल्या आगामी चित्रपटांच्या अपडेट्ससह परत येणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, तो सध्या इरांडू वनम आणि गट्टा कुस्ती २ या चित्रपटांसाठी व्यस्त असून, त्याच कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा ब्रेक घेतल्याचे बोलले जात आहे.

विष्णू विशालने ‘वेनिला कबाडी कुझू’, ‘कुल्लनारी कूट्टम’ आणि ब्लॉकबस्टर ‘रातसासन’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशालच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तो नुकताच बाबा झाला असून, २०२५ मध्ये त्याला आणि त्याची पत्नी ज्वाला गुट्टा यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठीही त्याने हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com