फेअरनेस क्रीममुळे केरळमधील १७ वर्षाच्या मुलीला किडनीचा आजार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध गायक सलीम कोडाथूर (Saleem Kodathoor) यानेही फेअरनेस क्रीमरमुळे किडनीचा आजार झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
लोकप्रिय 'माप्पिला पाट्टू' गायक सलीम कोडाथूर (Saleem Kodathoor) यांनं फेअरनेस क्रीम व्हिडीओने सोशल मिडिया खळबळ उडाली आहे. १० वर्षांपूर्वी 'फेअरनेस क्रीम' (त्वचा उजळवणारे क्रीम) वापरल्यामुळे 'मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी' (membranous nephropathy) हा मूत्रपिंडाचा / किडनी (kidney) आजार झाला. अशी धक्कादायक माहिती सलीम कोडाथूर यानं त्या व्हिडीओत दिली आहे.
गायकाने सांगितल्याप्रमाणे, कासारगोडमधील एका मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी हे उत्पादन वापरण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांतच त्वचा उजळल्याचे दिसून आले, परंतु त्यानंतर त्याला आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले. सलीम म्हणाले, "सुमारे १० वर्षांपूर्वी कासारगोडमधील एका मित्राने मला हे क्रीम दिले होते. मी दीड बाटली क्रीम वापरले. एका आठवड्यातच माझा रंग उजळला, पण महिनाभरानंतर मला लघवीच्या संसर्गामुळे (urinary infection) रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर, माझ्या पापण्यांवर आणि पायांवर सूज आली आणि मला खूप थकवा जाणवू लागला. डॉक्टरांनी सांगितले की, मला अल्ब्युमिनशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे शरीरातील प्रथिने कमी होत आहेत. अधिक तपासणीनंतर मला 'मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी' असल्याचे निदान झाले."
सलीम यांनी पुढे सांगितले की, त्यांनी ५०० रुपयांना हे क्रीम विकत घेतले होते आणि वर्षभरापेक्षा जास्त काळ त्याचा वापर केला. मात्र, आरोग्याच्या समस्या अजूनही त्यांना त्रास देत आहेत, विशेषतः झोपेशी संबंधित समस्या. ते म्हणाले, "मी दिवसातून फक्त दोन ते तीन तास झोपू शकतो. काही दिवस तर झोप येण्यासाठी मला औषधे घ्यावी लागतात." क्रीममुळे गायकाच्या शरीरात अशी लक्षणे जाणवली, ज्यामुळे तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अशक्त झाला. यामुळे त्याला आपले कार्यक्रम पुढे ढकलावे लागले, परिणामी आर्थिक नुकसान झाले, असे ही गायकाने सांगितले.
या घटनेमुळे आणि आता व्हायरल होणाऱ्या गायकाच्या व्हिडीओने सोशल मीडियावरील जाहिराती पाहून कोणतेही सौंदर्यप्रसाधन वापरण्यापूर्वी सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.