Shruti Vilas Kadam
हे जेल बनवण्यासाठी २ ते ३ ताज्या गुलाबांच्या पाकळ्या, ३ ते ४ चमचे गुलाबजल, ३ चमचे अॅलोवेरा जेल, १ व्हिटॅमिन-E कॅप्सूल आणि ड्राय स्किनसाठी अर्धा चमचा बदामाचे तेल घ्या.
गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर पाकळ्या मिक्सरमध्ये टाकून त्यात गुलाबजल घाला आणि बारीक पेस्ट तयार करा.
एका स्वच्छ बाऊलमध्ये गुलाबाची तयार पेस्ट आणि ३ चमचे अॅलोवेरा जेल घ्या. दोन्ही घटक एकजीव होईपर्यंत चांगले मिसळा.
आता मिश्रणात १ व्हिटॅमिन-E कॅप्सूलमधील तेल घाला. त्वचा कोरडी असल्यास अर्धा चमचा बदामाचे तेलही मिसळू शकता. जेल पुन्हा व्यवस्थित फेटून घ्या.
चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून कोरडा करा. त्यानंतर जेलचा पातळ थर चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. साधारण १५ ते २० मिनिटांनी धुऊन काढू शकता.
अॅलोवेरा त्वचेला मॉइश्चर देण्यास मदत करू शकते, तर गुलाबजल त्वचेला ताजेतवाने वाटण्यास मदत करते. व्हिटॅमिन-E आणि बदामाचे तेल त्वचेला मऊ ठेवण्यास मदत करू शकतात. नियमित स्किनकेअरसोबत हे जेल त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग दिसण्यास मदत करू शकते.
घरगुती जेल प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असे नाही. त्यामुळे वापरण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करा. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर करू नका. तयार जेल स्वच्छ, बंद डब्यात ठेवून शक्यतो लवकर वापरणे योग्य.