Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Daler Mehndi: दलेर मेहंदी यांच्यावर एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान दारू पिऊन आल्याचा आरोपा केला आहे. या आरोपावर कपिल शर्माने स्टोरी पोस्ट करत मोठा खुलासा केला आहे.
Daler Mehndi
Daler MehndiSaam Tv
Published On: 

Daler Mehndi: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी सध्या चर्चेत आहेत. उत्तराखंडमधील एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्यावर दारू पिऊन आल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर मनोरंजनविश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता कपिल शर्मा आणि गायक मीका सिंग यांनी दलेर मेहंदी यांची बाजू घेतली आहे. कपिल शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लोकांना कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्य जाणून घ्या असे आवाहन केले आहे.

कपिल शर्माने दलेर मेहंदी यांना दिला पाठिंबा

कपिल शर्मा यांनी दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ मीका सिंग यांची पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. यावेळी त्यांनी दलेर मेहंदी यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती दिली. कपिल यांनी लिहिले की, समोरची व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहे, याची आपल्याला कल्पना नसते. त्यामुळे कोणाबद्दलही मत बनवण्यापूर्वी सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दलेर मेहंदी लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा मंचावर परतून आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशी इच्छाही मी व्यक्त करतो.

मीका सिंग यांनीही केली भावाची पाठराखण

दलेर मेहंदी यांचे धाकटे भाऊ आणि गायक मीका सिंग यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खुलासा केला. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी सत्य तपासा असं ते म्हणाले. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मीका सिंग यांनी सांगितले, दलेर मेहंदी गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत आणि सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुम्ही कधी त्यांनी दारू पिताना पाहिलं आहेत का? मी स्पष्ट करतो जर, दलेर मेहंदी यांनी दारू प्यायली असेल तर मी गाणं बंद करेन.

नेमका वाद काय?

उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे आयोजित ‘माँ कुंजापुरी मेळा’मध्ये दलेर मेहंदी यांनी गाण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी मंत्री सुबोध उनियाल यांनी गायक मंचावर स्थिर उभे राहू शकत नसल्याचा आरोप करत ते गाण्यांवर लिप-सिंक करत असल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे दलेर मेहंदी यांच्या प्रकृती ठिक नसल्याच्या आणि स्टेजवरील त्यांच्या उपस्थितीबद्दल सोशल मिडियावर वाद रंगला आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com