Shruti Vilas Kadam
लघवी करताना वारंवार फेस येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास लघवीतून प्रथिने बाहेर पडू शकतात. त्यामुळे लघवीत फेस दिसू शकतो. मात्र, प्रत्येक वेळी फेस येणे म्हणजे किडनीचा आजार असे नाही.
दात स्वच्छ घासूनही तोंडातून किंवा श्वासातून सतत विचित्र वास येत असेल, तर ते किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील घाण बाहेर पडत नाही. त्यामुळे तोंडाला अमोनियासारखा वास येऊ शकतो.
किडनी शरीरातील जास्तीचे पाणी लघवीतून बाहेर टाकते. पण किडनीचे काम नीट होत नसेल, तर शरीरात पाणी साचू लागते. त्यामुळे पाय, हात, घोटे आणि चेहऱ्यावर सूज येऊ शकते.
लघवीचे प्रमाण कमी होणे, वारंवार लघवीला जाणे किंवा रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागणे, ही किडनीच्या समस्येची लक्षणे असू शकतात. काही वेळा लघवीतून रक्तही येऊ शकते. असे बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर त्यामागे किडनीची समस्या असू शकते. किडनीचे काम नीट होत नसल्यास शरीरात घाण साचते. त्यामुळे शरीराला सतत थकल्यासारखे वाटते.
शरीराला वारंवार खाज येत असेल किंवा त्वचा खूप कोरडी पडत असेल, तर हे किडनीच्या आजाराचे एक लक्षण असू शकते. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील घाण बाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचेला खाज येऊ शकते.
किडनीचे काम बिघडल्यास शरीरातील घाण बाहेर पडण्यास अडचण येते. त्यामुळे मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी होणे आणि खाण्याची इच्छा न होणे अशा समस्या जाणवू शकतात. अशी लक्षणे सतत दिसत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.