'बिग बॉस २०'च्या घरात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एलिमिनेशनमुळे एका स्पर्धकाचा प्रवास संपला असून, आता घराला टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत बिग बॉसच्या घरातील स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. कोणाचा खेळ ठरला भारी आणि कोणाला घराबाहेर पडावे लागले, जाणून घेऊया. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांची कान उघडणी केली तर काहींचे कौतुकही केले. बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवसाला नात्यांचे समीकरण बदलताना दिसत आहे. या आठवड्यात कोणाचा पत्ता कट झाला, जाणून घेऊयात.
'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन पार पडले. वाइल्डकार्ड स्पर्धक अभिनेता मनीष गोयलने घराला रामराम ठोकला. मनीष गोयलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. मनीष गोयलने 'बिग बॉस 20' च्या घरात वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. मनीष गोयल आपल्या तब्येतीमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे, ज्यासाठी अभिनेत्याला आराम घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मनीष गोयलला बिग बॉसच्या घरातील गेम प्रेक्षकांना खूप आवडला, त्यामुळे अभिनेता घरातून बाहेर गेल्यामुळे चाहते नाराज आहेत.
रोहीद खान
इशा रिखी
रिती तिवारी
नकुल धुळ
अमन गांधी
मेरी कोम
आसिफ खान
काझी तौकीर
आम्रपाली दुबे
अरिशफा खान
कनिका मान
कुशल तंवर (गुल्लू)
हर्ष विजय मचारे (यंग डीएसए)
तन्मय सिंग (स्काउट ओपी)
लव गिल
उदिती सिंग
माही विज
'बिग बॉस २०' चा हा मजेशीर खेळ कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता प्रसारित होतो आणि जिओ-हॉटस्टारवर रात्री ९:०० वाजता स्ट्रीम होतो. 'बिग बॉस २०'च्या ट्रॉफीसाठी सदस्यांमध्ये ताण आणखी वाढताना दिसणार आहे. कोण बाजी मारणार हे काही दिवसांतच समोर येईल. मनीष गोयलच्या घराबाहेर जाण्याने घरातील अनेक सदस्यांना वाईट वाटले आहे. आता घरात नवीन काय धमाका होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.