सलमान खान पुढचा 'वीकेंड का वार' होस्ट करणार नाही
सलमानच्या निर्णयाने चाहते नाराज
अमन गांधीची 'बिग बॉस २०' मधून एक्झिट
'बिग बॉस २०' च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चाहते बिग बॉस म्हटले की आतुरतेने 'वीकेंड का वार'ची वाट पाहतात, कारण त्या दिवशी सलमान खान घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. मात्र पुढच्या आठवड्यात सलमान खान 'बिग बॉस २०'चा 'वीकेंड का वार' होस्ट करणार नाही, अशी माहिती स्वतः सलमान खानने दिली आहे.
नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार'च्या भागात सलमान खान म्हणाला की, "आता मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटणार नाही. काही पूर्व नियोजित कामांमुळे मी पुढच्या आठवड्यात इथे नसेन..." हे ऐकताच घरातील सदस्य थोडे नाराज झाले. आता पुढच्या आठवड्यात 'वीकेंड का वार' कोण होस्ट करणार याचा खुलासा देखील भाईजानने केला आहे. तो पुढे म्हणाला की, "त्यामुळे मी रोहित शेट्टीला विनंती केली आहे की, त्याने पुढचा 'वीकेंड का वार' होस्ट करावा. " सलमानने स्पर्धकांना मेसेज दिला की, "जर तुम्हाला धोक्यांशी खेळायला आवडत असेल, तर जे काही करायचे आहे ते करून घ्या!"
एकंदर काही कामामुळे सलमान खान पुढचा 'वीकेंड का वार' होस्ट करणार नसून त्याच्या जागी चित्रपट निर्माता रोहित शेट्टी घरातील सदस्यांची शाळा घेताना, 'वीकेंड का वार' होस्ट करताना दिसणार आहे. रोहित शेट्टी पहिल्यांदाच सलमान खानच्या जागी सूत्रसंचालक म्हणून काम करणार नसून याआधीच्या सीझनमध्येही त्याने सलमानच्या जागी ही जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे चाहत्यांना रोहित शेट्टीचा धमाकेदार अंदाज पाहायला खूप आवडेल.
आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क रंगला आहे. या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी कोण नॉमिनेट होणार आणि या आठवड्यात कोणाचा घरातून पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार, यासाठी घरातील सदस्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.