Tiger Shroff firing : सलमान, बाबा सिद्दिकीनंतर आता टायगर श्रॉफवर हल्ला; बॉलिवूडमध्ये भीतीचे सावट, नेमकं चाललंय काय?

Tiger Shroff firing case latest update : सलमान खानला मिळणाऱ्या धमक्या, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार आणि टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याच्या वृत्तामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
Tiger Shroff firing case latest update
Tiger Shroff firing case latest updateसाम टीव्ही मराठी (AI)
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Lawrence Bishnoi gang latest news and allegations : अभिनेता सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्या, बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेला गोळीबार...या समोर आलेल्या सलग घटनांमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने निर्माण होणारी दहशत पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. त्यातच सोशल मीडियावर स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ समजणाऱ्या अनिल पंडित याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असल्याने या चर्चेला आणखीनच हवा मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर, देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणा नेमके काय करत आहेत? तसेच संभाव्य हल्ल्यांची पूर्वकल्पना मिळवण्यात गुप्तचर यंत्रणा कुठे कमी पडत आहेत? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, प्रत्येक घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचाच सहभाग आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सोशल मीडियावरील दावे, धमकीच्या कथित ऑडिओ क्लिप आणि प्रत्यक्ष गुन्ह्यातील सहभाग यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येपासून सुरू झालेली चर्चेची मालिका

२९ मे २०२२ रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आणि या टोळीच्या संघटित गुन्हेगारी कारवायांची देशभर चर्चा रंगली. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांना धमक्या देणे, त्यांच्यावर दबाव निर्माण करणे आणि गोळीबाराच्या घटनांच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे आरोप सातत्याने समोर येत राहिले.

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आणि तपासातही या टोळीशी संबंधित संशयितांचा तपास करण्यात आला. राजकीय वर्तुळापासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मुंबईसारख्या महानगरात राजकीय नेत्याची हत्या होणे ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसून, गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या धाडसाबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी घटना ठरली.

Tiger Shroff firing case latest update
Tiger Shroff : १० राऊंड फायर अन् टायगर गंभीर जखमी! अंगावर पट्ट्या बांधलेला पहिला फोटो समोर; प्रकृती चिंताजनक?

सलमान खानला धमक्या अन् घराबाहेर गोळीबार

अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कथित धमक्यांच्या कायमच केंद्रस्थानी राहिला आहे. २०२४ मध्ये वांद्रे येथील त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. त्यानंतरही सलमान खानला धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या. या सर्व प्रकरणांमुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि मुंबई पोलिसांसह विविध यंत्रणांना सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहावे लागले.

एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याला सातत्याने धमक्या मिळत असतील, तर त्या धमक्यांचे गांभीर्य तपासणे, संभाव्य हल्लेखोरांचा माग काढणे आणि हल्ल्याआधीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे, हे सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान असते. धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा वाढवणे महत्त्वाचे असले, तरी धमकी देणाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांची संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करणे तितकेच आवश्यक आहे.

रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार; चित्रपटसृष्टीतील भीती वाढली

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर, चित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचा दावा समोर आला असला, तरी त्याची पुष्टी तपासातील अधिकृत निष्कर्षांच्या आधारेच होणे गरजेचे आहे.

यापूर्वी पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल यांनाही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमक्या मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. या घटनांमुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांना लक्ष्य करून दबाव निर्माण करण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत.

Tiger Shroff firing case latest update
भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू; नातेवाईकाला सोडून गावी परतताना घडली दुर्घटना

टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ

१८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेतही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

जर या घटनेत प्रसिद्ध अभिनेत्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले असल्याचे तपासात स्पष्ट झाले, तर मुंबईतील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेबाबत नव्याने विचार करण्याची वेळ येईल. मात्र, केवळ सोशल मीडियावरील दाव्यांच्या आधारे मुंबई पोलीस कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाहीत; उलट कोणतीही कसूर न सोडता या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँच योग्य ती कडक कारवाई करतील यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com