भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू; नातेवाईकाला सोडून गावी परतताना घडली दुर्घटना

जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर कार आणि कंटेनरची भीषण धडक झाली. या अपघातात धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथील पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
Jalgaon Accident:
Jalgaon Accident:
Published On: 

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Jalgaon accident news today : जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कार आणि कंटेनरचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथील रहिवासी असून, एकमेकांचे नातेवाईक होते. या अपघातानंतर झुरखेडे गावावर शोककळा पसरली. (Bambahori bridge accident)

भुसावळजवळील वनोली येथे सध्या देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आलेल्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघे कारने गेले होते. तेथे नातेवाईकाला सोडल्यानंतर ते जळगावकडे आले आणि तेथून आपल्या 'झुरखेडे' या गावी परत जाण्यासाठी निघाले होते.

Jalgaon Accident:
Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

सर्वजण नातेवाईकांना सोडून कारने गावी परत येत होते. त्यावेळी बांभोरी पुलावरून त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिन्ही तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेमुळे झुरखेडे गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Jalgaon Accident:
Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com