Tiger Shroff : १० राऊंड फायर अन् टायगर गंभीर जखमी! अंगावर पट्ट्या बांधलेला पहिला फोटो समोर; प्रकृती चिंताजनक?

Tiger Shroff shooting incident latest news : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हात आणि छातीवर पट्ट्या बांधलेल्या अवस्थेतील फोटोमुळे चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.
Tiger Shroff first photo after alleged firing attack
Tiger Shroff first photo after alleged firing attackSaam TV News
Published On: 

Tiger Shroff first photo after alleged firing attack : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी रात्री गोळीबार झाला. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला आहे. पण त्याच्या प्रकृतीबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अखेर, टायगरचा हल्ला झाल्यानंतरचा पहिला फोटो समोर आला असून त्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढवली आहे. या फोटोमध्ये टायगरची अवस्था अतिशय बिकट दिसत आहे. त्याच्या हाताला आणि छातीला पट्ट्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि वेदना स्पष्टपणे दिसत आहेत. हा हल्ला नक्की कुणी केला? याचा तपास कऱण्यासाठी पोलिसांनी पथके तैणात केली आहेत.

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर अनोळखी हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात सुखरूप बचावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन टायगरची भेट घेत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्याच्या कुटुंबियांना धीर देत त्यांनी त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. एकनाथ शिंदेंनी भेट घेतल्यानंतर टायगर श्राफचे काही फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे. नेमकं त्याला काय झालं? गोळी घासून गेली की गाडीतच दुखापत झाली? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

Tiger Shroff first photo after alleged firing attack
Tiger Shroff first photo after alleged firing attack

फोटोमध्ये अभिनेता टायगर श्रॉफची प्रकृती चिंताजनक दिसत आहे. तो पांढऱ्या सोफ्यावर बसलेला असून त्याचे दोन्ही हात आणि छातीवर पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. उजव्या हातावर आणि छातीवर प्लास्टर लावलेलं आहे, तर डाव्या हाताला पट्ट्यांनी बांधलं आहे.

Tiger Shroff first photo after alleged firing attack
Tiger Shroff first photo after alleged firing attack

त्याचे केस विखुरलेले असून चेहऱ्यावर थकवा आणि वेदनांचे भाव स्पष्टपणे दिसत आहेत. तो एकाग्रतेने समोर बघत असून त्याच्या डोळ्यांमध्ये भीती आणि चिंता दिसून येत आहे. एकूणच, त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरून तो मोठ्या संकटातून बचावल्याचे संकेत मिळत आहेत.

Tiger Shroff first photo after alleged firing attack
Tiger Shroff first photo after alleged firing attack

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून, पोलिस आयुक्तांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. दुचाकी वरून आलेल्या तिघांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार केला. गोळीबारानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून फरार झाले. जुहू पोलीस ठाण्यासमोरून आरोपी अंधेरी स्थानकाच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. अंधेरी स्थानक परिसरात दुचाकी सोडून आरोपींनी रेल्वेने पळ काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com