Ramayana Collection : तिसऱ्या रविवारी 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर मोठी झेप, 'धुरंधर २'सह ९ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले

Ramayana Box Office Collection Day 18 : रणबीर कपूरच्या 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. दमदार कमाईमुळे चित्रपटाचे भारतातील नेट कलेक्शन १,००० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
Ramayana Box Office Collection Day 18
Ramayana CollectionAI PHOTO
Published On: 

रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांचा 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise of a Legend) हा चित्रपटाने रविवारी (२२ नोव्हेंबर) बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या चित्रपटाची देशांतर्गत नेट कमाई १,००० कोटी रुपयांच्या टप्प्याच्या जवळ पोहोचली आहे, तर जागतिक स्तरावरील एकूण ग्रॉस कलेक्शन १,६९० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. चित्रपटाने रिलीजच्या १८ व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'रामायण' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १८

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'रामायण' चित्रपटाने १८ व्या दिवशी १६,२७७ शोजच्या माध्यमातून भारतात ३५.६० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामध्ये हिंदी आवृत्तीचा वाटा सर्वाधिक असून, १३,८५२ शोजमधून २६.२५ कोटी रुपयांची कमाई झाली. मल्याळम आवृत्तीतून ३.४० कोटी रुपये, तर कन्नड आवृत्तीतून २.५० कोटी रुपयांची भर पडली. तमिळ आणि तेलुगू आवृत्तींनी अनुक्रमे २.४० कोटी रुपये आणि १.०५ कोटी रुपयांची कमाई केली.या आकडेवारीसह, चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई १,१२६.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर नेट कमाई ९४२.७५ कोटी रुपये इतकी झाली आहे. परदेशातील कमाई ५६७ कोटी रुपये असून, यामुळे चित्रपटाची जागतिक स्तरावरील एकूण कमाई १,६९३.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'रामायण' चित्रपटाने 'ॲनिमल'लाही टाकले मागे

रणबीर कपूरच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटाने १८ व्या दिवशी तुलनेने कमी कमाई केली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार,भारतात ५.७५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्या दिवशी ११,६३४ शोजमधून ६.७० कोटी रुपयांची एकूण ग्रॉस कमाई झाली.यापैकी हिंदी आवृत्तीतून ५.२५ कोटी रुपये, तर तेलुगू आणि तमिळ आवृत्तीतून अनुक्रमे ४० लाख रुपये आणि १० लाख रुपयांची कमाई झाली. त्या दिवशी परदेशातूनही चित्रपटाने १.६५ कोटी रुपयांची एकूण ग्रॉस कमाई केली. प्रदर्शनाच्या त्या टप्प्यावर, 'ॲनिमल' चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ५१८.१९ कोटी रुपये आणि एकूण ग्रॉस कमाई ६१६.९० कोटी रुपये इतकी होती. परदेशातील एकूण ग्रॉस कमाई २२५.६५ कोटी रुपये होती, ज्यामुळे चित्रपटाची जागतिक स्तरावरील एकूण कमाई ८४२.५५ कोटी रुपयांवर पोहोचली होती.

Ramayana Box Office Collection Day 18
Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीन घाई! लाडक्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा, PHOTO शेअर करत दिली गुडन्यूज

'रामायण'ने तिसऱ्या रविवारी 9 चित्रपटांचे रेकॉर्ड केले ब्रेक

मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'ने तिसऱ्या रविवारी, म्हणजेच १८ व्या दिवशी, 'धुरंधर २' (३० कोटी), 'छावा' (२४.३ कोटी) यांसारख्या इतर नऊ चित्रपटांना बॉक्स ऑफिस कमाईत मागे टाकले आहे.

  • धुरंधर - ४०.३ कोटी

  • रामायण - ३५.६० कोटी

  • धुरंधर २ - ३० कोटी

  • छावा - २४.३ कोटी

  • स्त्री २ - २२ कोटी

  • महाअवतार नरसिंह - १८ कोटी

  • गदर २ - १६.१ कोटी

  • जवान - १३.९ कोटी

  • दंगल - १३.६८ कोटी

  • ॲनिमल - १३.५ कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.