रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' (Ramayana: Rise Of A Legend) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. चित्रपट ५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. प्रदर्शनाचे दोन आठवडे पूर्ण झाले असून, या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारतीय महाकाव्याला जागतिक स्तरावर भव्य सिनेमॅटिक स्वरूप देण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १६ व्या दिवशी, २० नोव्हेंबर, शुक्रवारी 'रामायण'ने १६.३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. भारतात 'रामायण'ची एकूण नेट कमाई ८८०.०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.'रामायण: भाग १' ने पहिल्या आठवड्याच्या अखेरीस ५६४ कोटी रुपयांची कमाई केली होती.'रामायण'ची हिंदी आवृत्ती ही ६५० कोटी रुपयांचा नेट टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची दुसऱ्या आठवड्यातील कामगिरीही उल्लेखनीय राहिली आहे.'धुरंधर २' नंतर, 'रामायण' हा २०२६ मधील दुसरा असा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्याने दुसऱ्या आठवड्यात २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने जगभरात तब्बल ₹१,५७४.६० कोटींचा व्यवसाय केला आहे.
दिवस १: ६४.८५ कोटी रुपये
दिवस २: ४८.०५ कोटी रुपये
दिवस ३: ६९.८० कोटी रुपये
दिवस ४: ५६.१५ कोटी रुपये
दिवस ५: १०७.५० कोटी रुपये
दिवस ६: ९४.१० कोटी रुपये
दिवस ७: ७०.६५ कोटी रुपये
दिवस ८: ५३.५० कोटी रुपये
दिवस ९: ४८.१० कोटी रुपये
दिवस १०: ७२.९० कोटी रुपये
दिवस ११: ७५ कोटी रुपये
दिवस १२: ३२ कोटी रुपये
दिवस १३: २८.३५ कोटी रुपये
दिवस १४: २३.२० कोटी रुपये
दिवस १५: १९.३५ कोटी रुपये
दिवस १६: १६.३० कोटी रुपये
एकूण : ८८०.०५ कोटी रुपये
'रामायण' हा चित्रपट केवळ हिंदी भाषेपुरता मर्यादित नसून भारतातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. निर्मात्यांनी हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन केले आहे. दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोले जात आहे. पहिल्या भागातून रामायणाच्या कथेची सुरुवात आणि महत्त्वाच्या घटनांचे चित्रण केले जाणार आहे. तर दुसऱ्या भागात कथेचा पुढील प्रवास पाहायला मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.