Ramayana : रणवीर सिंहच बॉक्स ऑफिसचा धुरंधर, 'रामायण'चं ॲडव्हान्स बुकिंग किती? कमाईत कोण ठरणार वरचढ?

Ramayana- Dhurandhar 2 : 'रामायण भाग १' हा रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' च्या ॲडव्हान्स बुकिंगला तगडी टक्कर देत आहे. मात्र रणबीर कपूरचा चित्रपट कमाईच्या बाबतीत 'धुरंधर २' च्या खूप मागे आहे.
Ramayana- Dhurandhar 2
Ramayana SAAM TV
Published On: 
Summary

रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ५ नोव्हेंबरला रिलीज होणार

'रामायण भाग १' आणि 'धुरंधर २' मध्ये तगडी टक्कर

चित्रपटाचे एकूण बजेट ४००० कोटी रुपये आहे.

दिवाळीमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट रिलीज होणार आहेत. रणवीर सिंगचा 'धुरंधर २' हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने जागतिक स्तरावर ₹१,८५२.४४ कोटींची कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' नंतर आता सर्वाधिक कमाई करेल अशी अपेक्षा रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपटाकडून आहे.

'रामायण भाग १' ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईत 'धुरंधर २' ला मागे टाकेल अशी सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती, मात्र १५ दिवसांपूर्वी ॲडव्हान्स बुकिंग सुरू होऊनही रणबीर कपूरचा 'रामायण' हा रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' च्या मागे आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ४००० कोटी रुपये आहे. 'रामायण' पार्ट १ चे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्मिते नमित मल्होत्रा आहेत.

'धुरंधर २' ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईत आघाडीवर

१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' ला भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ॲडव्हान्स बुकिंग मिळाले होते. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमधून ५० कोटींहून अधिक कमाई केली आणि एक असा विक्रम प्रस्थापित केला, जो मोडण्यासाठी इतर अनेक चित्रपटांना संघर्ष करावा लागला.

'रामायण भाग १' ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'धुरंधर २' ला टक्कर

४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'रामायण भाग १' ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'धुरंधर २'ला तगडी टक्कर देत आहे. 'रँडम सिने मूड'नुसार, 'बुक माय शो'वर 'रामायण'ची अंदाजे ५.२३ लाख तिकिटे प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी विकली गेली. दरम्यान, त्याच वेळेपर्यंत 'धुरंधर २' ची ११ लाख तिकिटे विकली गेली होती. याव्यतिरिक्त, 'रामायण'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून अंदाजे ₹24 कोटींची कमाई केली.

Ramayana- Dhurandhar 2
Ramayana : 'रामायण'चा तिसरा भागही येणार? रणबीर कपूरच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण | VIDEO

'रामायण' रिलीज डेट

'रामायण' पार्ट १ दिवाळीत ५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.'रामायण' मध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, साऊथ अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.