Ramayana: पाकिस्तानमध्येही 'रामायण'ची क्रेझ! कराचीतील मंदिरात लावले रणबीर कपूरच्या चित्रपटाचे पोस्टर

Ramayana Movie: रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या रामायण चित्रपटाची पाकिस्तानमध्येही चर्चा रंगली आहे. कराचीतील मंदिरात पोस्टर लावण्यात आले असून चाहत्यांनी चित्रपटाला ऑस्कर मिळावा अशी इच्छा व्यक्त केली.
Ramayana Movie
Ramayana MovieSaam Tv
Published On: 

Ramayana Movie: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ सुपरस्टार यश आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर परदेशातही रंगताना दिसत आहे. यासह, पाकिस्तानमधील कराची येथेही 'रामायण' चित्रपटाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. येथील एका मंदिरात चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कराचीतील मंदिरात लावले 'रामायण'चे पोस्टर

पाकिस्तानमधील कराची येथे राहणाऱ्या हिंदू समुदायाने 'रामायण' चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कराचीतील एका मंदिरात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले आहे. यावेळी उपस्थित लोकांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

Ramayana Movie
Imran Khan: मुंबई उच्च न्यायालयात अभिनेता इम्रान खानची बिनशर्त माफी; भारत सोडावा लागणार? कोर्टात काय घडलं

चित्रपटाला ऑस्कर मिळावा, अशी चाहत्यांची इच्छा

कराचीमधील एका युट्युबरने या मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक हिंदू काही लोक 'रामायण' चित्रपटाबद्दल आपला उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत. काहींनी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवेल, अशी आशा व्यक्त केली आहे. तर काही चाहत्यांनी या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा, अशी इच्छाही बोलून दाखवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा सुरू आहे.

Ramayana Movie
Director Injured: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; प्रसिद्ध दिग्दर्शकाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

दोन भागांत प्रदर्शित होणार 'रामायण'

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, साई पल्लवी माता सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल, रवी दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, कुणाल कपूर आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांसोबतच परदेशातील प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.