Director Injured: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; प्रसिद्ध दिग्दर्शकाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Director Injured: हॉलीवूड दिग्दर्शक मायकल मॅन यांना लॉस एंजेलिसमधील गन रेंजमध्ये अपघाती गोळीबारात दुखापत झाली. ८३ वर्षीय मॅन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
hollywood famous director michael mann accidental shoot himedelf injury
hollywood famous director michael mann accidental shoot himedelf injury Saam Tv
Published On: 

Director Injured: हॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मायकल मॅन यांना अपघाती गोळीबारात दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लॉस एंजेलिसमधील एका गन रेंजमध्ये ही घटना घडली. ८३ वर्षीय मायकल मॅन यांच्या कमरेला लावलेले बंदूक चुकून चालल्याने त्यांच्या पायाला गोळी लागली. सुदैवाने या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, मायकल मॅन लॉस एंजेलिसमधील 'द रेंज एलए' येथे गेले असताना हा अपघात झाला. TMZ या सेलिब्रिटी न्यूज वेबसाइटने सर्वप्रथम यासंदर्भातील वृत्त दिले. मायकल मॅन आपली बंदूक कंबरेच्या म्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यातून गोळी सुटली आणि त्यांच्या पायाला लागली. त्यानंतर तातडीने आपत्कालीन मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

hollywood famous director michael mann accidental shoot himedelf injury
Sayaji Shinde: 'झाडं तोडून होणारा विकास खोटारडा'; सयाजी शिंदे संतापले, झाडतोडीविरोधात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन

मायकल मॅन यांच्या मॅनेजरने सांगितले की, या घटनेत त्यांच्या पायाला वरवरची दुखापत झाली आहे. लॉस एंजेलिस पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. प्राथमिक तपासात हा गोळीबार अपघाती असल्याचे स्पष्ट झाले. ॉकरण्यात आले.

hollywood famous director michael mann accidental shoot himedelf injury
Phulwara: 'घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!'; रवी जाधव यांच्या 'फुलवरा'ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

'हीट', 'मॅनहंटर'सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक

मायकल मॅन हे हॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि अनुभवी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. 'मॅनहंटर', 'द लास्ट ऑफ द मोहिकन्स' आणि 'हीट' यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना जगभरात ओळख मिळाली. विशेष म्हणजे 'हीट' हा गेल्या काही दशकांतील सर्वाधिक प्रशंसित क्राईम चित्रपटांपैकी एक मानला जातो. याशिवाय १९८० च्या दशकातील लोकप्रिय 'मायमी व्हाइस' या टीव्ही पोलीस मालिकेच्या निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.त्यांचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट 'फेरारी' हा २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अॅडम ड्रायव्हर आणि पेनेलोप क्रूझ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.